सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांच्या कृपेने आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:51 AM2017-11-14T01:51:30+5:302017-11-14T01:53:23+5:30

राज्यात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळ्यातील तीन आरोपी पोलिसांच्या कृपेने अजूनही मोकळे फिरत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची बाब राज्याच्या पुरवठा मंत्र्यांसमक्ष उघडकीस येऊन व आरोपींना चोवीस तासांत अटक करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पोलिसांचा आरोपींवरील कृपेची ‘अर्था’तच चर्चा होऊ लागली आहे.

Surgana grain scam: Police arrest accused | सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांच्या कृपेने आरोपी मोकाट

सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांच्या कृपेने आरोपी मोकाट

Next
ठळक मुद्देसुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळापोलिसांचा आरोपींवरील कृपेची ‘अर्था’तच चर्चाआरोपींना २४ तासांत अटक करण्याचे आदेश

नाशिक : राज्यात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळ्यातील तीन आरोपी पोलिसांच्या कृपेने अजूनही मोकळे फिरत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची बाब राज्याच्या पुरवठा मंत्र्यांसमक्ष उघडकीस येऊन व आरोपींना चोवीस तासांत अटक करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पोलिसांचा आरोपींवरील कृपेची ‘अर्था’तच चर्चा होऊ लागली आहे.  दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या धान्य घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अन्नधान्य महामंडळातून निघणारे रेशनचे धान्य प्रत्यक्षात सुरगाण्याच्या शासकीय गुदामात न जाता ते वाहतूक ठेकेदाराच्या मदतीने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात होते. तब्बल सव्वा वर्षे चाललेल्या या घटनेत शासनाचे सव्वासात कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याची बाब गुदाम तपासणीत उघडकीस आली होती. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २४ संशयितांविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचा तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडे सोपविण्यात आला होता. राज्यभर गाजलेल्या या घटनेची दखल घेत राज्य सरकारने जिल्ह्णातील सात तहसीलदारांसह तेरा जणांना निलंबितही करण्यात आले होते. सदरचा गुन्हा घडून दोन वर्षे झाली असून, यातील तीन आरोपी वगळता अन्य आरोपींविरुद्ध पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रही दाखल केले, परंतु या गुन्ह्णातील मुख्य सूत्रधार व वाहतूक ठेकेदार मोरारजी भिकुलाल मंत्री, संजय रामकृष्ण गडाख व दीपक पारसमल पगारिया हे तिघेही अद्याप मोकाट फिरत आहेत. या तिघांनीही अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. 
आदेश धुडकावला  पोलिसांना अद्यापही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याचे माहिती नसल्याची बाब दोन दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर येऊन गेलेल्या अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या समक्ष उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या उपस्थितीत या साºयाप्रकरणाची जाहीर वाच्यता झाल्यानंतर बापट यांनी आरोपींना २४ तासांत अटक करण्याचे आदेश दिले; परंतु अद्यापही पोलिसांनी आरोपींना हात लावलेला नाही. या संदर्भात पुरवठा खात्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. तथापि, पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणात दाखविलेल्या हलगर्जीपणाबद्दल उलटसुलट  चर्चा होत आहे.

Web Title: Surgana grain scam: Police arrest accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.