रविवार ठरला 'अपघात'वार; 8 ठार 25 पेक्षा अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 13:26 IST2019-02-24T13:24:03+5:302019-02-24T13:26:34+5:30
बीड-नाशिकच्या दोन्ही अपघातात एकूण 8 ठार

रविवार ठरला 'अपघात'वार; 8 ठार 25 पेक्षा अधिक जखमी
पिंपळगाव (नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर दोन आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार ठार तर 25 जण जखमी झाले. रविवारी दुपारी साडेबारा वाजता सदर अपघात झाला. पिंपळगाव बसवंत शिवारात सदर अपघात झाला. घटनास्थळी मदतकार्य राबविण्यात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर दोन आयशर टेप्मोंची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात 4 ठार 25 जण जखमी झाले आहेत. तर बीडजवळील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले होते. लग्न सोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणाºया ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक घडली. त्यामुळे रविवार हा दुर्दैवाने अपघातवार ठरला आहे. सकाळपासून दिवसभरातील अपघाताच्या विविध घटनांमध्ये एकूण 8 जण ठार झाले असून 25 पेक्षा अधिकजण जखमी झाल्याची माहिती आहे.