Suicide by taking a plunge in love well | प्रेमीयुगुलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देतालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदअजय व रेशमा यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला

मालेगाव : तालुक्यातील मळगाव येथील अजय दौलत ढोले (२२) व रेशमा संतोष गांगुर्डे (१८) या प्रेमीयुगुलांना आपले लग्न होणे शक्य नसल्याने त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारीत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
अजय व रेशमा हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे घरचे त्यांचा शोध घेत होते. गावातील सिराज शेख हे शेतीपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना अजय व रेशमा यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, उपनिरीक्षक जयसिंग राजपूत यांनी धाव घेतली. दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Web Title: Suicide by taking a plunge in love well
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.