जिल्ह्यात १०१ शेतकºयांची आत्महत्या आकडा शंभरीपार : पंधरा वर्षांतील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:31 AM2017-12-10T00:31:09+5:302017-12-10T00:34:47+5:30

Suicide rate of 101 farmers in the district: 150 years high | जिल्ह्यात १०१ शेतकºयांची आत्महत्या आकडा शंभरीपार : पंधरा वर्षांतील उच्चांक

जिल्ह्यात १०१ शेतकºयांची आत्महत्या आकडा शंभरीपार : पंधरा वर्षांतील उच्चांक

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १०१ शेतकºयांची आत्महत्या आकडा शंभरीपार : पंधरा वर्षांतील उच्चांक

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तू ढोकणे या शेतकºयाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांतील हा उच्चांक मानला जात असून, आगामी निवडणुकीत हा राजकीय मुद्दा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यशवंत दत्तू ढोकणे (६५) यांच्या नावावर बारा ते तेरा हेक्टर क्षेत्र शेवगे दारणा व पळसे येथे असून, त्यांच्या नावे आयडीबीआय बॅँकेत सात ते आठ लाख रुपये कर्ज आहे तसेच सोसायटीचेही तीन लाख रुपये कर्ज आहे. 
ते स्वत: बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ढोकणे यांनी घराच्या मागच्या पडीक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आला. ढोकणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून, कर्जबाजारीपणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्णात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, दर महिन्याला सरासरी आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत.
विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षीदेखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतकºयांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे. शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथील प्रल्हाद नथू अहिरे (६०) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या शंभर झाली होती, त्यात शनिवारी यशवंत ढोकणे यांच्या आत्महत्येने भर पडली आहे. नाशिक तालुका त्या मानाने सधन मानला जात असतानाही शेतकºयाने आत्महत्या केल्याने एकट्या तालुक्यात चार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
राज्यात सन २००२ पासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, तेव्हापासून त्यात सातत्याने वाढच होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र समाधानकारक पाऊस व शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने हा विषय आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मुद्दा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Suicide rate of 101 farmers in the district: 150 years high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक