इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:03 AM2018-02-22T00:03:50+5:302018-02-22T00:18:25+5:30

तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या ‘मिनी ट्रॅक्टर’ या बहुद्देशीय कृषी साधनाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

The success of the school in the Inspire Award science exhibition | इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाचे यश

इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाचे यश

googlenewsNext

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या ‘मिनी ट्रॅक्टर’ या बहुद्देशीय कृषी साधनाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.  नाशिक येथील हिंदी माध्यमिक विद्यालयात नुकताच पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात २९३ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. त्यातील २७ उपकरणांची वर्धा येथे होणाºया राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विद्यालयातील सौरभ कोकाटे, आदर्श चव्हाणके, श्याम कोकाटे, कुणाल कांदळकर या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षक कल्पेश चव्हाण, तुकाराम सानप यांच्या मार्गदर्शनाखाली या उपकरणांची निर्मिती केली आहे. उपकरणांसाठी लोखंडी पाइप, कुटी यंत्रासाठी वापरले जाणारे डिझेल इंजिन, बेअरिंग्ज, रबरी पट्टा, चेन, व्हील आदी टाकावू वस्तूंपासून सुमारे सहा हजार रुपये खर्च करून हा ‘मेड इन वडांगळी’ मिनी ट्रॅक्टर बनविला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या उपकरणाद्वारे पेरणी, कोळपणी, वखरणी, फणणी या कामांबरोबरच द्राक्ष व डाळिंब बागांमध्ये आंतरमशागतीची कामे सहज करता येतील.

Web Title: The success of the school in the Inspire Award science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा