भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:46 PM2019-07-08T18:46:54+5:302019-07-08T18:47:23+5:30

सटाणा : शहराला देशभरात ओळख मिळवून देणाऱ्या देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या रथमार्गावरील वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाचा सोमवारी (दि.८) नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.

Start of work of underground power channel | भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला प्रारंभ

सटाणा येथील देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या रथ मार्गावील विद्युत तारा भुमिगत करण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवुन शुभारंभ करतांना नगराध्यक्ष सुनिल मोरे समवेत उपनगराध्यक्ष महेश देवरे, भालचंद्र बागड आणि नगरसेवक.

Next
ठळक मुद्देसटाणा शहरातील ५ किलोमीटर होणार भूमिगत विद्युत वाहिनींचे काम

सटाणा : शहराला देशभरात ओळख मिळवून देणाऱ्या देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या रथमार्गावरील वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाचा सोमवारी (दि.८) नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
याप्रसंगी शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश खैरनार व नगरसेवक भारती सूर्यवंशी यांच्या हस्ते सपत्नीक पूजाविधी करण्यात आला.
देवमामलेदारांची रथ मिरवणूक यात्रा उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. त्यासाठी राज्यभरातील हजारो भाविक हजेरी लावतात. परंतु शहरातील प्रमुख मार्गांवरून पारंपारिक पद्धतीने काढण्यात येणाºया रथमार्गात विजेचे पोल आणि तारा यामुळे मोठा अडथळा येत होता. या उघड्यावरील विजतारांमुळे प्रसंगी अपघात होण्याचीही भिती असल्याने वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार नगरपालिकेकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. वीजतारा भूमिगत करण्याच्या कामातील सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर एस.टी.इलेक्तिट्रकल प्रा.लि.पुणे या कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात कंपनीने कामास प्रत्यक्ष सुरु वात केली असुन सोमवारी (दि.८) मान्यवरांच्याहस्ते कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. कार्यक्र मासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, गतनेते राकेश खैरनार, नितिन सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती भारती सूर्यवंशी, संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, नगरसेवक बाळू बागुल, सुनीता मोरकर, राहुल पाटील, सोनाली बैताडे, आरिफ शेख, आशा भामरे, रु पाली सोनवणे, दीपक पाकळे, सुवर्णा नंदाळे, सुरेखा बच्छाव, विद्या सोनवणे, मनोहर देवरे, देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, ट्रस्टी रमेश सोनवणे, हेमंत सोनवणे, प्रवीण पाठक, दीपक सोनवणे, प्रकाश आहिरे, आहिराराव आदी उपस्थित होते.

अशी होतील कामे....
शहरातील ११ केव्ही उच्चदाब वाहिनी जवळपास २.२ किलोमीटर अंतरापर्यंत भूमिगत करण्याचे काम होत असून त्यासाठी शासनाने ३९.२८ लक्ष निधी रु पये दिला आहे. नव्या अमरधामपासून यात्रा परिसरापर्यंत हे काम करण्यात येत आहे. यात्रा मार्गावरील जवळपास २.५ किलोमीटर अंतराची लघुदाब वाहिनी भूमिगत करण्यासाठीही २१.९३ लक्ष व १५.४ लक्ष असा दोन टप्प्यात निधी खर्च करण्यात येत आहे.

Web Title: Start of work of underground power channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.