कडवा आवर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:46 PM2018-12-04T17:46:48+5:302018-12-04T17:47:01+5:30

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Solution to the farmers due to the frequent recurrence | कडवा आवर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

कडवा आवर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

Next

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रब्बीच्या १७०० हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे. प्रारंभी वडांगळीसह १४ गावे पाणी पुरवठा योजनेचा एमआय टॅँक भरून दिल्यानंतर पुतळेवाडी येथील शेवटच्या टोकापासून रब्बीच्या पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. १७०० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कडवा धरणात सद्यस्थितीत १३७० दलघफू इतका जीवंत पाणीसाठा आहे. त्यापैकी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी दिले जाणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरु स्तीनंतर ४०० क्युसेक इतकी क्षमता झाली आहे. प्रारंभी २७५ क्युसेकने कालव्याचा विसर्ग सुरु असून तो ३५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी सांगितले.

Web Title: Solution to the farmers due to the frequent recurrence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी