राष्टÑवादीने दिले युवकांना सोशल मिडीयाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:50 PM2018-03-24T15:50:17+5:302018-03-24T15:50:17+5:30

राष्टÑवादी भवन येथे यावेळी पाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंट उघडून देण्यात आले. राजकीय व सामाजिक विषयावर गप्पा मारत रोज वापरणा-या फेसबुक, व्टीट्वीटर, इंस्टाग्राम सारख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन परिपूर्ण उपयोग जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया शिबिर आयोजित करण्यात आले

Social Media Teach | राष्टÑवादीने दिले युवकांना सोशल मिडीयाचे धडे

राष्टÑवादीने दिले युवकांना सोशल मिडीयाचे धडे

Next
ठळक मुद्देपाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंट उघडून देण्यात आलेसत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर

नाशिक : आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने युवकांना सोशल मिडीयाचा वापर व त्याची माहिती देण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शनिवारी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसने सोशल मिडीया शिबीर भरवून सुरूवात केली आहे.
राष्टÑवादी भवन येथे यावेळी पाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंट उघडून देण्यात आले. राजकीय व सामाजिक विषयावर गप्पा मारत रोज वापरणा-या फेसबुक, व्टीट्वीटर, इंस्टाग्राम सारख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन परिपूर्ण उपयोग जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला सॉफ्टवेअर इंजिनियर योगेश फुंदे यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी या सोशल मिडिया शिबिराचे आयोजन राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले होते. पक्षाने केलेली विकासकामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सर्वात सोपा आणि कोणालाही जमेल असा अत्यंत प्रभावी मार्ग सोशल मिडिया हा आहे. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रेरणेतून तसेच युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा कोते यांचे मार्गदर्शनाखाली या सोशल मिडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नाशिक जिल्हा निरीक्षक विशाल काळभोर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, नाशिक योगेश निसाळ, अँड चिन्मय गाढे, कैलास मोरे, शिवराज ओबेरॉय, रोहन नहिरे, नवराज रामराजे, विशाल कोशिरे, डॉ.संदीप चव्हाण, रेहान शेख, विशाल तायडे, सागर बेदरकर, निलेश कर्डक, रवींद्र पुरकर, राजेश पाटील, संतोष भुजबळ, सचिन बिडकर, भूषण गायकवाड, मनोज चव्हाण, प्रविण साळुंके, सुरगाणा अध्यक्ष राजु पवार, राहुल तुपे, सिद्धार्थ गायकवाड, मनीष भागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Social Media Teach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.