येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 07:42 PM2019-07-18T19:42:04+5:302019-07-18T19:42:39+5:30

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.

Social forestry department organized 1 lakh 8 thousand 729 trees in Yeola | येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देबावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.
कोटमगाव येथे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते तर पांजरवाडी येथे आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. भारम येथे वृक्ष लागवड पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरु ड यांच्या हस्त, अंकाई येथे डॉ. सुधीर जाधव यांच्या हस्ते झाले. या वृक्षांची देखरेख तीन वर्षांपर्यंत करणे. कुंपण, पाणी, संरक्षण तेथील व सुरक्षतेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येतात. त्यासाठी सदर वृक्षांची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी वन मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाने येवला तालुक्यातील बावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत महत्वाचे रस्ते, कालवे, रेल्वे महामार्ग आदी बाजूला वृक्षांची लागवड करण्यात येते. या योजनेतून सदरचा खर्च भागविण्यात येतो. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना खिर्डीसाठे येथील रोपवाटिकेत कोपरगाव येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.
नाशिक वन विभागाकरिता ८८ लाख, सामाजिक वनीकरण २५ लाख, वन विकास महामंडळ १४ लाख ३४ हजार, ग्रामपंचायत विभाग ४२ लाख २३ हजार वृक्षांची उद्दिष्टे देण्यात आली होती. येवला तालुक्यात सामाजिक वनीकरण विभाग एक लाख ९७ हजार वृक्षांची लागवड जुलै अखेर करावयाची आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
पांजरवाडी गट लागवड १० हजार, भारम २५ हजार, बाभूळगाव ते पाटोदा रस्ता ५ हजार, सावरगाव ते येवला ५ हजार,कोटमगाव ते गवंडगाव ५ हजार, अंगणगाव ते देशमाने ५ हजार, नगरसुल ते धामोडे ३ हजार, कौठ खेडे ते नागडे ५ हजार, नगरसुल ते ममदापुर ५ हजार, कौठ खेडे ते भारम रहाडी पर्यंत ५ हजार, वाई बोथी ते अंदरसुल ५ हजार, नगरसुल ते खिडीसाठे २ हजार, सावरगाव ते पाटोदा ५ हजार, वाई बोथी ते न्याहारखेडा एक हजार, या प्रमाणे रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
 

Web Title: Social forestry department organized 1 lakh 8 thousand 729 trees in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल