इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या साठ टक्के पाऊस

By admin | Published: August 4, 2016 12:59 AM2016-08-04T00:59:21+5:302016-08-04T00:59:43+5:30

इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या साठ टक्के पाऊस

Sixty percent rainfall in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या साठ टक्के पाऊस

इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या साठ टक्के पाऊस

Next

घोटी : सरासरी ३५०० मिलिमीटर पावसाची नोंद होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेने थोडीही उसंत न दिल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने अवघ्या महिन्याभरात सन २००७चा विक्रम मोडीत काढत सरासरीच्या साठ टक्के पाऊस झाला असल्याने तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
गेली चार दिवसांपासून
इगतपुरी तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला असून, या पुराचा फटका तालुक्यातील जनजीवनावर झाला असल्याचे दिसून येते. या पुराच्या पाण्यात घोटी-भगूर रस्त्यावरील वंजारवाडीजवळील महत्त्वाचा पूल गेल्याने या भागातील बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन व वंजारवाडी आदि गावांचा भगूर शहराशी संपर्क तुटला. परिणामी या गावातील नागरिकांना भगूरला जाण्यासाठी महामार्गाला वळसा मारून येण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sixty percent rainfall in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.