सिन्नर विधानसभा मतदारसंघात २२ हजार मतदारांची वाढ, तरुणांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:39 AM2019-03-21T05:39:58+5:302019-03-21T05:45:28+5:30

नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन लाख ९३ हजार २५५ मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख ७१ हजार ४०४ होती.

Sinnar assembly constituency increased by 22 thousand voters, more number of youth | सिन्नर विधानसभा मतदारसंघात २२ हजार मतदारांची वाढ, तरुणांची संख्या अधिक

सिन्नर विधानसभा मतदारसंघात २२ हजार मतदारांची वाढ, तरुणांची संख्या अधिक

Next

सिन्नर - नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन लाख ९३ हजार २५५ मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख ७१ हजार ४०४ होती.
यावेळी विधानसभा मतदारसंघात २१ हजार ८५१ इतक्या मतदारांची भर पडली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सिन्नरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील, निवासी नायब तहसीलदार दत्ता जाधव, दिलीप पवार, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ उपस्थित होते.

बीएलओमार्फत नवीन रंगीत मतदान कार्डाचे वाटप
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमुळे अनेक नवमतदारांनी आपली नावे नोंदविली. या नवमतदारांना रंगीत ओळखपत्रांचे वितरण बीएलओमार्फत केले जाणार आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात ११ हजार ९८६ नवीन मतदारांना हे रंगीत ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे.

२१ हजार ८५१ नवमतदार प्रथमच करणार मतदान

निवडणूक प्रशासनाकडून विशेष मोहिमेद्वारे २१ हजार ८५१ नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील ४ हजार ३८८ मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शाखेतर्फे १ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यानंतर २३ व २४ फेब्रुवारी तसेच २ व ३ मार्च दरम्यान मोहिमेत फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी केली होती. त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघात आता १ लाख ५४ हजार ६३६ पुुरुष व १ लाख ३८ हजार ६१९ स्त्रिया अशी २ लाख ९३ हजार २५५ एवढी मतदारसंख्या झाली आहे.

Web Title: Sinnar assembly constituency increased by 22 thousand voters, more number of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.