शिवाजीनगर स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांनी दानपेटीतील रोकडसह कपाटात ठेवलेला चांदीचा मुकूट केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 17:06 IST2017-12-10T16:54:02+5:302017-12-10T17:06:13+5:30
शिवाजी नगर येथील स्वामी समर्थ केंद्राचा शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली.

शिवाजीनगर स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांनी दानपेटीतील रोकडसह कपाटात ठेवलेला चांदीचा मुकूट केला लंपास
नाशिक : स्वामी समर्थ केंद्राचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोकडसह कपाटात ठेवलेला चांदीचे मुकूट चोरून नेल्याची घटना सातपुर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेखर दत्तात्रेय सहाणे (रा.आई बंगला,स्वामी समर्थ केंद्रापाठीमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिवाजी नगर येथील स्वामी समर्थ केंद्राचा शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकड आणि लाकडी कपाटात ठेवलेले चांदीचे चार मुकूट असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.