शंकरराव वैरागकर यांच्या संगीत मैफलीस रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:09 AM2017-10-23T00:09:36+5:302017-10-23T00:16:45+5:30

: दीपावलीनिमित्त नाशिक शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजºया होणाºया पाडवा पहाट उपक्रमाचे यावर्षीपासून जेलरोड येथेही आयोजन करण्यात आले. शुक्रवारी (दि.२०) पवारवाडी येथे आयोजित पहाट पाडवा उपक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 Shankarrao Vairagkar's music concert rave reviews | शंकरराव वैरागकर यांच्या संगीत मैफलीस रसिकांची दाद

शंकरराव वैरागकर यांच्या संगीत मैफलीस रसिकांची दाद

Next

नाशिकरोड : दीपावलीनिमित्त नाशिक शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजºया होणाºया पाडवा पहाट उपक्रमाचे यावर्षीपासून जेलरोड येथेही आयोजन करण्यात आले. शुक्रवारी (दि.२०) पवारवाडी येथे आयोजित पहाट पाडवा उपक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  ज्येष्ठ गायक पं.शंकरराव वैरागकर यांनी यावेळी ‘रंजन वना’ हा अभंग सादर केला तसेच मनमोहन मुरलीवाला, पाहिला नंदाचा नंदन या गौळणींना रसिकांनी विशेष दाद दिली. ही संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना ‘अवघा तो शकून’, ‘जो भजे हरी को सदा’ या हिंदी भजनांनी या मैफलीला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. यानंतर गायत्री जोशी यांनी राग जीवनपुरी सादर करताना बडा ख्याल आणि छोटा ख्याल सादर करत रसिकांची मने जिंकली तसेच भटियार रागात एक तालात छोटा ख्यालची बंदीश तसेच मीरा भजनदेखील गायत्री जोशी यांनी यावेळी सादर केले.  कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना अवघा रंग एकची झाला, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या भक्तिगीतांना रसिकांनी विशेष दाद दिली. याकार्यक्रमात अजिंक्य जोशी (तबला), व्यंकटेश धवन (पखवाज), सागर जोशी (संवादिनी), अथर्व वैरागकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी केले. यावेळी अजित बने, नगरसेवक रंजना बोराडे, शरद मोरे, प्रकाश बोराडे, संजय भालेराव, सुधाकर जाधव, ओंकार वैरागकर, सरिता वैरागकर, सुनील महाले, राजेंद्र बोराडे, म्हाळू बोराडे, दत्तात्रेय बोराडे, सौरभकुमार शुल्क, अ‍ॅड. अरुण वाकचौरे, सुनील पवार, खुशाल धाकिते आदी उपस्थित होते.

Web Title:  Shankarrao Vairagkar's music concert rave reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.