कळवणला शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:25 AM2018-05-14T00:25:09+5:302018-05-14T00:25:09+5:30

येथील नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरु ंद होऊन सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण करून सीमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी नगरपंचायतीने शहरातील अतिक्रमणांवर हातोडा चालवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

Shahir Lane, Kalvana, destroyed the encroachment in Ram Mandir area | कळवणला शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली

कळवणला शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली

Next

कळवण : येथील नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरु ंद होऊन सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण करून सीमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी नगरपंचायतीने  शहरातील अतिक्रमणांवर हातोडा चालवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.शहरातील रस्ते काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा ठरलेली अतिक्र मणे हटवण्याचा निर्धार नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी केला असल्याने रस्ते विकासकामांमध्ये अडथळा ठरू पहाणाºया नगरपंचायतीकडे जाणाºया शाहीर लेन व राम मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणांवर नगरपंचायतीने जेसीबी फिरवला. या कारवाईमुळे अतिक्र मणधारकांचे धाबे दणाणले आहेत.  शहरांतर्गत कॉलनी, चौक व रस्त्यांवर छोट्या-मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी ही डोकेदुखी ठरल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नगरपंचायतने पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी सावरकर चौक, माउली चौक, मशीद परिसर व रविवारी शाहीर लेन या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली. अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आदेश दिले होते. शाहीर लेन व राम मंदिर परिसरातील रस्त्यांवरील जुन्या गटारीवर नागरिकांनी अतिक्र मण करून बांधलेल्या पायºया, ओटे, लोखंडी जिने आदी अतिक्रमणेहटवण्यात आली. तत्पूर्वी स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काहींनी स्वत: पुढाकार घेऊन अतिक्र मण काढून घेत नागरिकांनी अतिक्रमण काढण्याबाबत नगरपंचायतीला सहकार्य केले, तर काहींनी अतिक्रमण्े काढली नाही. पुन्हा अतिक्र मण होणार नाही यासाठी नगरपंचायतीने पावले उचलावीत, अशी मागणी पुढे आली आहे.
अतिक्र मणधारकांना नोटिसा
कळवण नगरपंचायतीच्या वतीने शहरांतर्गत रस्त्यांचे व गटारी दुरु स्तीचे काम सुरू आहे. या कामात अडथळा ठरू पाहणाºया अतिक्र मणसंदर्भात अतिक्रमणधारक, टपरीधारकांना आपापली अतिक्र मण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र अतिक्र मणे काढण्यात आली नाही. मुख्य अधिकारी डॉ. पटेल यांनी जेसीबी चालवून अतिक्र मण हटवले.  डॉ. न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिर या शिवाजीनगर अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्र मणे करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला होता. या अरुंद रस्त्यावरून होणारी वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून या रस्त्याचे रु ंदीकरण करण्याचे काम हाती घेतल्यावर या रस्त्यावरील सर्व अतिक्र मणे काढण्यात आली.

Web Title: Shahir Lane, Kalvana, destroyed the encroachment in Ram Mandir area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक