एस.जी. विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:42 PM2018-08-12T18:42:12+5:302018-08-12T18:42:43+5:30

माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती मिळणार आहे.

SG Scholarships to eleven students of the school | एस.जी. विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

एस.जी. विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Next

सिन्नर : येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यावेळी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, व्यवस्थापक अभिषेक गडाख यांच्या हस्ते आर्यन नवले, कार्तिक गुरुळे, कामिनी कोकाटे, अभिजित शिंदे, भूषण कामडी, रंजित मोहन, जयबहादूर चौधरी, सौरभ मोजाड, शिवांश सिंग, श्रद्धा मोरे, तन्वीर शेख, सिद्धार्थ मोरे, सार्थक कोकाटे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, पर्यवेक्षक माधवराव शिंदे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख अनिता थोरात, विलास सातपुते, रु पेश कुºहाडे, अरु ण बस्ते, राजू कांबळे, दीपक तांबे, चंद्रकला साळुंखे, शुभांगी मोगल, सीमा सांगळे, बळीराम आरखडे आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: SG Scholarships to eleven students of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.