शहरातील शाळांमध्ये दुमदुमला विठूनामाचा गजर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:30 AM2018-07-21T00:30:06+5:302018-07-21T00:30:24+5:30

शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केले होती. तसेच टाळ, पिपळ्या व विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी निघाली.

In the schools of the city, Dumdumba Vithunamachar alarm ... | शहरातील शाळांमध्ये दुमदुमला विठूनामाचा गजर...

शहरातील शाळांमध्ये दुमदुमला विठूनामाचा गजर...

Next

नाशिक : शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केले होती. तसेच टाळ, पिपळ्या व विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी निघाली.  के. के. वाघ इंग्लिश स्कूल, डी.जी.पी.नगर येथे पूर्व प्राथमिक विभागात आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी मुख्याध्यापक चित्रा नरवडे, रविना पवार, तसेच सुरेखा नन्नावरे, सविता गोर्डे, संगीता गांगुर्डे, हिना पिरझादा यांचे मार्गदर्शन लाभले.
सातपूरला वृक्षदिंडी
सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठुनामाच्या जयघोषात परिसरातून वृक्ष आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करीत विविध घोषणा देत वृक्षलागवडीचा संदेश दिला आहे. विद्यार्थी विठ्ठलाच्या वेशात, तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशात उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले यांच्या हस्ते दिंडीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी चिटणीस प्रा. के. के. जाधव, संपत अहेर, नरेंद्र वाणी, तुकाराम शिंदे, शरद गांगुर्डे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक सुलोचना गांगुर्डे, पर्यवेक्षक सुदाम दाणे यांनी वृक्षलागवडीचे आणि आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले.  प्रास्ताविक संध्या जाधव यांनी केले. सूत्रसंचालन एस. टी. गिरी यांनी केले. साहेबराव कासव यांनी स्वागत केले. शोभा कदम यांनी आभार मानले.
मेरी हायस्कूलच्या प्रांगणात रंगला दिंडी सोहळा
ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकारामाच्या जयघोषात सीडीओ मेरी हायस्कूलमधील चिमुकल्यांनी जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल म्हणत रिंगण करीत दिंडी काढली व परिसरातील सर्व भाविक नागरिकांचे लक्ष वेधले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यवाह राजेंद्र निकम, पालक संघाचे कार्याध्यक्ष सचिन निरंतर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले, शोभा भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातवीच्या बालगोपालांनी भक्तिगीते सादर केली, प्रास्ताविक आशा डावरे यांनी केले, सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. कल्पना जोपळे यांनी आभार मानले.
शिशुविहार शाळेत दिंडी
 आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि.२०) शिशु विहार शाळेत पांडुरंगाची पालखी सजवण्यात आली होती. माधुरी गडाख, मुख्याध्यापक मानसी बापट, भाग्यश्री पाटोळे यांनी पालखीचे पूजन केले. सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगांच्या गजरात पांडुरंगाची विविध भजने म्हटली. शिक्षिका निशिता कुलकर्णी यांनी यावेळी आषाढी एकादशीची माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह सर्वांनी वृक्षारोपण केले.
रेडियंट टोट्समध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त रेडियंट टायनी टोट्स चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या दिंडीत चिमुकल्यांनी वारकरी वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला. चिमुकले वारकरी तुळशीमाळ घालून टाळ, मृदुंगाच्या गजरात पालखी घेऊन टाळांच्या गजरात सहभागी झाले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी शाळेच्या प्रांगणाभोवती फिरवली. फुगडीची साद व टाळ-मृदुंगाचा नाद यासोबत वातावरण दुमदुमून गेले. कार्यक्र माची सुरु वात शाळेच्या मुख्याध्यापक गीता व्यास यांच्या हस्ते विठ्ठल-रु ख्मिणी पूजनाने झाले. सूत्रसंचालन संगीता शर्मा व सोनाली पिंगळे यांनी केले. संगीत शिक्षिका क्षिप्रा बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांनी भक्तिगीत सादर केले.

Web Title: In the schools of the city, Dumdumba Vithunamachar alarm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा