वाचनाची आवड रुजविण्यासाठी शाळेने साकारले १८० फुट लांबीच्या रेल्वेत ग्रंथालय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 02:16 PM2018-11-11T14:16:32+5:302018-11-11T14:18:34+5:30

लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी असून यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फुट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.

The school has a 180-foot-long railway track library to teach the reading interest | वाचनाची आवड रुजविण्यासाठी शाळेने साकारले १८० फुट लांबीच्या रेल्वेत ग्रंथालय 

वाचनाची आवड रुजविण्यासाठी शाळेने साकारले १८० फुट लांबीच्या रेल्वेत ग्रंथालय 

Next
ठळक मुद्देवाचनाची आवड रुजविण्यासाठी रेल्वेत साकारले ग्रंथालय नाशिकमधील इस्पॅलियर शाळेचा अनोखा उपक्रम

नाशिक : लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी असून यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फुट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.
शिक्षण अभ्यासक तथा शाळेचे प्रमुख सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करण्यात आली असून या रेल्वेचे डिझाईन यतीन पंडित यांनी केले असून शाम लोंढे यांनीही डिझाईन आणि निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. टाकाऊ तून टिकाऊ संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करताना जुन्या लोखंंडाचा वापर करण्यात आला आहे.  या ग्रंथालयाचे उदघाटन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाले. यावेळी नंदलाल काळे, डॉ. प्राजक्ता जोशी, कुमुदिनी बंगेरा यांच्यासह राजलक्ष्मी बँकेचे संचालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून या आगळया वेगळया लायब्ररीची निर्मिती करण्यात आल्याचे सचीन जोशी यांनी सांगितले. या रेल्वे लायब्ररीला ‘मोहन टू महात्मा’ असे नाव देण्यात आले आहे. या रेल्वेमध्ये चाळीस विद्यार्थी ऐका वेळेस पुस्तके वाचू शकतात. किमान चार हजार पुस्तक त्यात ठेवण्यात आली आहे. तसेच प्रोजेक्टरची ही व्यवस्था करण्यात आली आहे.

लिम्का बूकमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न 
 रेल्वेतील ग्रथालयाची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहे. जपानमध्ये रेल्वेच्या डब्यांमध्ये भरणाऱ्या शाळेविषयी  वाचले होते.त्यानंतर रेल्वेच्या डब्यामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आला आणि विंटेज रेल्वेतील ग्रंथालय शाळतील सर्वांच्या  प्रयत्नाने उभे राहिल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले.

Web Title: The school has a 180-foot-long railway track library to teach the reading interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.