संजीवनगरला युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:44 AM2018-12-16T00:44:55+5:302018-12-16T00:45:10+5:30

घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़

 Sanjivnagar's youth suicide | संजीवनगरला युवकाची आत्महत्या

संजीवनगरला युवकाची आत्महत्या

Next

नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा. भवानी रो हाऊस, संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
कारमधून गोवंशीय मांस जप्त
कोकणीपुरा परिसरात संशयास्परित्या उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून (एमएच १५, ईबी ८७६२) भद्रकाली पोलिसांनी १ हजार १५० रुपये किमतीचे ३० किलो गोवंशीय मांस शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास जप्त केले़ या प्रकरणी अल्ताफ मुश्ताक शेख (२९, रा. भद्रकाली) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुचाकीस्वारांनी  मोबाइल चोरला
 गिरणीत दळण घेऊन गेलेल्या इसमाने बाहेरील बाकावर ठेवलेला महागडा मोबाइल पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याीची घटना गुरुवारी रात्री पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ घडली़ या प्रकरणी जितेद्र कार्लेकर (३६ रा.सनराइज अपा, कमलनगर) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडको भागात बुलेटची चोरी सिडकोतील आषाढ सेक्टरमधील रहिवासी योगेश ठाकरे (हंसनी निवास) यांची ५० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच १५ एफबी ९१००) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गोरक्षनगरला दुचाकीची चोरी
 दिंडोरीरोडवरील गोरक्षनगरमधील गणेश बैरागी (सूरशक्ती अपार्टमेंट) यांची सीडी डीलक्स दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शाळकरी मुलीचा विनयभंग
 शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी जेलरोड परिसरातील गोसावीनगरमध्ये राहणाºया अल्पवयीन मुलास उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात पीडित शाळकरी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार १ डिसेंबर २०१७ ते १२ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशयित मुलगा हा तिच्या घराजवळ तसेच शाळेत येता-जाता पाठलाग करीत असे़ संशयिताने मुलीस रस्त्यात अडवून प्रेमाची मागणी केली. तसेच तुझ्या भावाचा अपघात करील अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला़

Web Title:  Sanjivnagar's youth suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.