पाणी योजनेसाठी तहसीलदारांना सर्वपक्षीय साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:17 AM2019-03-10T01:17:16+5:302019-03-10T01:17:53+5:30

पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे.

Sabahpashee to Tehsildars for water scheme | पाणी योजनेसाठी तहसीलदारांना सर्वपक्षीय साकडे

पाणी योजनेसाठी तहसीलदारांना सर्वपक्षीय साकडे

Next

सटाणा : पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे.
सटाणा शहराचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी शहरासाठी केळझर प्रकल्पातून स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे काम सुरू करण्यात आलेले असताना प्रकल्प क्षेत्रातील नेते आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे ती योजना बारगळली.
त्यानंतर सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाण्याचे आरक्षण करण्यात येऊन योजनेच्या निधीला मंजुरी दिली. मात्र पुनंद लाभक्षेत्रातील नेत्यांनी जलवाहिनीच्या कामास विरोध सुरू केल्याने ही योजना ही संकटात सापडली आहे.
पुनंद पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देऊन पुनंद पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नितीन सोनवणे, मंगलसिंग जोहरी, मंगेश भामरे, बापू कर्डवाल, अब्दुल बोहरी, दादा इंगळे, रोशन सोनवणे, राजनसिंग चौधरी, विक्र ांत पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Sabahpashee to Tehsildars for water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.