भोजापूर धरणाच्या पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:50 PM2018-11-13T17:50:32+5:302018-11-13T17:50:46+5:30

नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या निमोण भागातील पिंपळे, पळसखेडे, कºहे, सोनेवाडी येथील संतप्त शेतकºयांनी भोजापूर धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडावे तसेच प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कºहेफाटा येथे रस्तारोको आंदोलन केले.

Road to angry farmers of Bhojapur dam water | भोजापूर धरणाच्या पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

भोजापूर धरणाच्या पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

Next

नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या निमोण भागातील पिंपळे, पळसखेडे, कºहे, सोनेवाडी येथील संतप्त शेतकºयांनी भोजापूर धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडावे तसेच प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कºहेफाटा येथे रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती.
भोजापूर पाटपाणी संघर्ष समितीचे अभियंता हरिश्चंद्र चकोर, पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत घुगे, संगमनेरचे शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप सांगळे यांच्या उपस्थितीत भोजापूर धरणाच्या आरक्षित पाण्याचे आवर्तन निमोण भागासाठी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात रस्तारोको करण्यात आला. निमोणसह परिसरातील गावांमध्ये पावसाअभावी खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पावसाअभावी या भागातील कुपनलिका, विहिरींचे उद्भव कोरडे पडले आहेत. त्यामुळे भोजापूरचे आवर्तन त्वरित सोडण्याची तसेच दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलक शेतकºयांनी केली. हरिश्चंद्र चकोर, संदीप सांगळे, पांडुरंग गोमासे यांनी आपल्या भाषणातून संतप्त भावना व्यक्त केल्या. संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, नाशिक पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी आंदोलकांना भोजापूर पाणीप्रश्नी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सबंधित अधिकाºयांना मागणीचे निवेदन देण्यात आले. सुमारे अर्धातास रस्ता रोखून धरल्यानंतर अखेर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. ्र
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात पांडुरंग गोमासे, मंगेश वालझाडे, मुरलीधर चकोर, भाऊपाटील कोटकर, पोपट घुगे, दत्तू ढोणे, बाळासाहेब सानप, राजू भोजने, ज्ञानेश्वर घुगे, नामदेव कोटकर, एकनाथ चकोर, गणपत चकोर, गणपत घुगे, राजाराम चकोर, पुंजा ढोणे, मनोज मंडलिक, नंदू घुगे, दशरथ ढोणे, संतोष घुगे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Road to angry farmers of Bhojapur dam water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप