महापारेषणच्या स्पर्धेत ‘उत्तरदायित्व’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:11 AM2019-01-30T01:11:20+5:302019-01-30T01:11:52+5:30

राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब प्रकल्प समन्वय व सुरक्षा परिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरमंडळीय नाट्य स्पर्धेत ‘उत्तरदायित्व’ नाटकाने बाजी मारली तर एक होता बांबुकाका या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला.

 'Responsibility' first in the campaign for Maha Transition | महापारेषणच्या स्पर्धेत ‘उत्तरदायित्व’ प्रथम

महापारेषणच्या स्पर्धेत ‘उत्तरदायित्व’ प्रथम

Next

नाशिक : राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब प्रकल्प समन्वय व सुरक्षा परिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरमंडळीय नाट्य स्पर्धेत ‘उत्तरदायित्व’ नाटकाने बाजी मारली तर एक होता बांबुकाका या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला.
कालिदास कलामंदिरात नाट्यस्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिने-अभिनेत्री मधुरा देशपांडे या उपस्थित होत्या. प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत विके यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
यावेळी प्रा. निरंतर विद्याधर लिखित उत्तरदायित्व नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. या नाटकाचे सादरीकरण मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले. सकाळच्या सत्रात सादर करण्यात आलेल्या राजेंद्र पोळ लिखित ‘एक होता बांबुकाका’ या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला. या नाटकामधील अभिनय करणाऱ्या कलावंत व लेखक, दिग्दर्शकांना देशपांडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यामध्ये ‘उत्तरदायित्व’ने आघाडी घेतली, तर भिजलेल्या गोष्टी या नाटकाला यामध्ये दुसरा क्रमांक राखता आला.
‘एक होता बांबूकाका’ या नाटकाचे संगीत द्वितीय क्रमांकाचे ठरले. रंगभूषा व वेशभूषेतदेखील ‘उत्तरदायित्व’ सरस ठरले, तर भिजलेल्या गोष्टीने द्वितीय क्रमांक मिळविला. परीक्षक म्हणून लक्ष्मी गाडेकर, मंगेश बनसोड, विश्वनाथ निळे यांनी काम पाहिले.
यांचे अभिनय ठरले सर्वोत्कृष्ट
पुरुष- प्रथम- गौरव सावंत (भिजलेल्या गोष्टी), द्वितीय- संजय महाजन (बांबूकाका).
स्त्री - प्रथम- अश्विनी कोरडे-सूर्यवंशी (उत्तरदायित्व), द्वितीय- रिना पाटील (भिजलेल्या गोष्टी).
तसेच ‘भिजलेल्या गोष्टी’मधील नितेश वानखेडे तर उत्तरदायित्वमध्ये अभिनय करणाºया स्नेहल दराडे यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

Web Title:  'Responsibility' first in the campaign for Maha Transition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक