वेदमूर्तींना ‘पूर्णवाद वेदमूर्ती’ पुरस्कारपुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:10 AM2017-11-06T00:10:29+5:302017-11-06T00:10:55+5:30

सोहळा : विद्या-कला-नीती समिती नाशिक : पूर्णवाद वेदमूर्ती व संगीत उपासक प्रदान सोहळा रविवारी (दि.५) उत्साहात संपन्न झाला. पूर्णवाद विद्या- कला-नीती पुरस्कार समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

The 'Purvastav Vedmurthi' award was given to the devotees by the devotees | वेदमूर्तींना ‘पूर्णवाद वेदमूर्ती’ पुरस्कारपुरस्कार प्रदान

वेदमूर्तींना ‘पूर्णवाद वेदमूर्ती’ पुरस्कारपुरस्कार प्रदान

Next

सोहळा : विद्या-कला-नीती समिती

नाशिक : पूर्णवाद वेदमूर्ती व संगीत उपासक प्रदान सोहळा रविवारी (दि.५) उत्साहात संपन्न झाला. पूर्णवाद विद्या- कला-नीती पुरस्कार समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. डॉ. विष्णू महाराज पारनेरकर उपस्थित होते. पारनेरकर यांच्या हस्ते वेदमूर्ती पुरस्कार माधवशास्त्री परांजपे गुरुजी व संगीत उपासक पुरस्कार इंदौर येथील कल्पना झोकरकर यांना प्रदान क रण्यात आला. दरवर्षी पुरुषोत्तम काका भडकमकर व गजानन बुवा सरवटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पुरस्करांचे वितरण करण्यात येते. दरम्यान, पुरस्कारार्थी म्हणून परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वेदविद्या व त्याचे महत्त्व विशद केले.
काळानुरूप वेदांचे पठण कमी होत चालले आहे; मात्र वेदांचे पठण आणि त्यामध्ये असलेली शक्ती आपण ओळखली पाहिजे. पूर्णवाद परिवाराच्या वतीने वेदांचे अध्ययन करणाºयांचा सन्मान करण्याची परंपरा सुमारे एक तपापासून पाळली जात आहे, ही कौतुकाची बाब आहे. दरम्यान, पुरस्कार वितरणानंतर झोकरकर यांच्या शास्त्रीय गीत गायनाची मैफल उत्तरोत्तर रंगली. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

Web Title: The 'Purvastav Vedmurthi' award was given to the devotees by the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.