साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने चिटको, शर्मा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:11 AM2018-03-05T01:11:47+5:302018-03-05T01:11:47+5:30

नाशिक : महिलांचा सृजनशील आविष्कार शांततेत होत असतो, त्यामुळे तो अनेकदा समाजापुढे येत नाही.

Publication of books by Chitko and Sharma on behalf of Sahitya Sarita Hindi Forum | साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने चिटको, शर्मा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने चिटको, शर्मा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

Next
ठळक मुद्दे ‘कँटीले कैक्टस मेें फूल’ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनमहिलांचे कर्तृत्व हे समाजापुढे वारंवार येण्याची गरज

नाशिक : महिलांचा सृजनशील आविष्कार शांततेत होत असतो, त्यामुळे तो अनेकदा समाजापुढे येत नाही. मात्र समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमाकर यांनी केले.
साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने गंगापूररोड परिसरातील शंकराचार्य संकुल सभागृहात डॉ. विद्या चिटको लिखित ‘नाशिक के बहु सांस्कृतिक परिप्रेक्ष्य में स्त्री’ व आनंदबाला शर्मा लिखित ‘कँटीले कैक्टस मेें फूल’ या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे हे होते. याप्रसंगी डॉ. रोचना भारती, डॉ. विद्या चिटको, सी. पी. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी करमाकर म्हणाले, महिलांमध्ये निसर्गाने मोठी शक्ती दिली असून, त्यांचा आविष्कार हा नेहमीच शक्तिशाली राहिलेला आहे. देशाच्या इतिहासात अनेक महिलांची नावे त्यांच्या कर्तबगारीमुळे आजही तितक्याच अभिमानाने झळकत आहेत. महिलांचे कर्तृत्व हे समाजापुढे वारंवार येण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विद्या चिटको यांनी सांगितले की, नाशिकच्या इतिहासात योगदान देणाºया महिलांचे कार्यकर्तृत्व पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येण्यास मदत झाली आहे. तसेच शर्मा यांनीही पुस्तकाविषयी वर्णन केले.

Web Title: Publication of books by Chitko and Sharma on behalf of Sahitya Sarita Hindi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.