मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 02:04 PM2019-02-27T14:04:01+5:302019-02-27T14:04:09+5:30

चांदवड- : मराठी भाषेत गोडवा आहे, लय आहे, ती आमची राजभाषाच नाही तर मायभाषा आहे. आम्ही भाग्यवान आहोत, कारण आम्ही मराठी बोलतो, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा शिरीष गंधे यांनी केले.

 Program on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम

मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम

googlenewsNext

चांदवड- : मराठी भाषेत गोडवा आहे, लय आहे, ती आमची राजभाषाच नाही तर मायभाषा आहे. आम्ही भाग्यवान आहोत, कारण आम्ही मराठी बोलतो, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा शिरीष गंधे यांनी केले. येथील आबड-लोढा-जैन महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या राजभाषा दिनाच्या आयोजनानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डाँ.सुरेश पाटील उपस्थित होते. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डाँ तुषार चांदवडकर यांनी केले.अतिथींचा परिचय प्रा. गणेश अहिरे यांनी करून दिला. प्रा.गंधे यांनी बोलींचे विशेष तसेच अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचे अर्थ व कारणे, गंमती जमती सांगितल्या. आपल्या व्याख्यानाचा समारोप प्रा गंधे सरांनी आपल्या गाजलेल्या कवितेने केला. आभार प्रदर्शन प्रा.रमेश इंगोले यांनी केले. कार्यक्र माला प्रा.ए.ए.वकील, प्रा.योगेश अहेर यांची उपस्थिती होती.

Web Title:  Program on Marathi Official Language Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक