सातपूर येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:15 AM2018-03-19T01:15:08+5:302018-03-19T01:15:08+5:30

The program of Baradadwad in Satpur is enviable | सातपूर येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

सातपूर येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देपाडव्याची परंपरा : भवानी मातेचा यात्रोत्सवहजारो भाविकांचा सहभाग

सातपूर : सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढून सातपूरगावात भवानी मातेचा यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. बारागाड्या ओढण्याचा मान यावर्षी मंगेश निगळ या युवकास देण्यात आला होता.
गेल्या १२६ वर्षांपासून सातपूरगावात भवानी मातेचा यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. बारागाड्या ओढणाऱ्यास श्रीगणेशा संबोधले जाते. रु ढी आणि परंपरेनुसार या गणेशाचा मान निगळ घराण्याकडे आहे असून, या गणेशाला साडीचोळी, पितांबर, फेटा, चाळ असा पेहराव करण्यात आली. श्री व शक्ती एका रूपात पूजण्याचा अर्थात शिवपार्वती (अर्धनारीनटेश्वर) हे प्रतिकात्मक रूप अंगिकारले आहे. सायंकाळी या श्रीगणेशाची गावातून मंगलवाद्यांच्या सुरात मिरवणूक काढण्यात आली.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील भवानी मातेचे दर्शन घेऊन आल्यानंतर एकमेकांना बांधून ठेवलेल्या बारागाड्यांना प्रदक्षिणा घालून श्रीगणेशाने या गाड्या ओढल्या. त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी सातपूर पंचक्र ोशीतील शेकडो भाविक सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, अपूर्व हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, प्रभाग सभापती माधुरी बोलकर, नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव, पल्लवी पाटील, हेमलता कांडेकर, नयना गांगुर्डे, डॉ. डी. एल. कराड आदिसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक सीमा निगळ, यात्रा समितीचे अध्यक्ष विजय भंदुरे, उपाध्यक्ष विलास घाटोळ, गोकुळ निगळ, शांताराम निगळ, राजाराम निगळ, प्रकाश निगळ यांनी स्वागत केले.

Web Title: The program of Baradadwad in Satpur is enviable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक