सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:09 AM2019-03-05T01:09:47+5:302019-03-05T01:10:01+5:30

शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.

 Produce organic food in organic farming: Abasaheb More | सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

Next

भगूर : शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले शेतकरी गणेश निसाळ यांनी कृषिक्षेत्रांत विविध प्रयोग करून सेंद्रिय शेती करणाऱ्या राज्यातील शेतकरी, उद्योजक, शासकीय अधिकारी यांचा सन्मान भगूर-लहवितरोड येथे आयोजित केला होता. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, नगरसेवक मोहन करंजकर बाबूराव मोजाड, विजय करंजकर, सरोज अहिरे, कावेरी कासार, शांताराम चांदोरे, डॉ. संजय वसावे, डॉ. एस. आर. देशमुख, डॉ बी. एन. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाळदे यांनी, तर आभार अरुण निसाळ यांनी केले. कार्यक्रमास तानाजी भोर, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे, संजय मोरे, प्रवीण गुळवे, पंकज तांगाडकर, अशोक निसाळ, शांताराम गिते आदींसह कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
गणेश निसाळ यांची यशोगाथा
राज्यातील कृषी क्षेत्र आणि सेंद्रिय शेतीशी निगडीत चाळीस व्यक्तींना शाल, वृक्षरोप आणि सन्मानपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. गणेश निसाळ यांनी आपली यशोगाथा कथन करतांना सेंद्रिय शेती, शेतीपूरक उद्योगाविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचाही विविध संस्था, व्यक्तींच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Web Title:  Produce organic food in organic farming: Abasaheb More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.