शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:01 AM2018-02-10T00:01:59+5:302018-02-10T00:28:42+5:30

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे.

Prefer city bus service: recruitment as required; Chief Minister's agenda to implement e-Governance | शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

Next
ठळक मुद्देआवश्यकतेनुसार नोकरभरती निर्देशानुसारच आपला कारभार

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि.९) मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच आपला कारभार चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, शहर बससेवा ताब्यात घेण्याला प्राधान्यक्रम दिला जाणार असून, ई-गर्व्हनन्सवर भर देत आवश्यकतेनुसार नोकरभरती केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंढे यांनी आपली नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांना गती देणे आणि माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची उभारणी करणे आदी बाबींवर आपला भर राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. मुंढे म्हणाले, शहर बससेवा महापालिकेनेच चालवायची आहे. त्याबाबतचा अहवाल क्रिसिलने महापालिकेला दिलेला आहे. फक्त मॉडेल कोणते वापरायचे यावर निर्णय बाकी आहे. शहराला सार्वजनिक वाहतुकीची जास्त आवश्यकता आहे. भविष्यात शहराचे पर्यावरणीयदृष्ट्या संतुलन बिघडायचे नसेल तर खासगी वाहनांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा लागणार आहे. महापालिकेत यापुढे कोणताही प्रकल्प राबविताना त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय, हे तपासले जाईल. कामांच्या निविदा या प्रचलित डीएसआर रेटच्यावर जाणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल. गुणवत्तेशी अजिबात तडजोड केली जाणार नाही. शहरात वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी पार्किंग पॉलिसी तयार करण्यात येईल. आॅफ रोड पार्किंगवर जास्त भर दिला जाईल. शहरातील स्वच्छताही महत्त्वाची आहे. सफाई कामगारांनी वेळेवर नियमित सफाई केली पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: शहरात फिरणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. महापालिकेत अपुºया मनुष्यबळाची जाणीव आहे. शासनाकडे महापालिकेने आकृतिबंध पाठविला आहे. तो शासनाकडून मंजूर करून आणून आवश्यकतेनुसार कुशल कर्मचाºयांची भरती केली जाईल. प्रशासकीय कामकाजात आयटीचा वापर अधिक वाढविण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाºया प्रकल्पांना गती दिली जाणार असून, महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांच्यात उत्तम समन्वय राखला जाईल, अशी ग्वाहीही मुंढे यांनी दिली.

Web Title: Prefer city bus service: recruitment as required; Chief Minister's agenda to implement e-Governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.