शहरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:21 AM2018-05-14T00:21:04+5:302018-05-14T00:21:04+5:30

जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़

 Police raids on two plots in the city | शहरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

शहरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

Next

नाशिक : जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़
इंगळेनगर पाण्याच्या टाकीजवळ कल्याण बाजार मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनुसार नाशिकरोड पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित दिलीप देवीदास राठोड (शिवगंगा सोसायटी, जेलरोड) व संजय पांडुरंग चव्हाण (श्रमिकनगर, जेलरोड) हे दोघे मटका जुगार खेळत होते़ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९३० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़  मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळा-पाथर्डी रोडवरील भारतनगरमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१२) सकाळी छापा टाकला़ यावेळी संशयित हारुण मोहम्मद शेख व त्याचे सहा साथीदार कल्याण मुंबई नावाचा मटका जुगार खेळत होते़ पोलिसांनी या सातही संशयितांना ताब्यात घेऊन रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले़

Web Title:  Police raids on two plots in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.