उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:18 AM2019-05-15T01:18:46+5:302019-05-15T01:19:03+5:30

समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

Police lost five years ago | उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

Next
ठळक मुद्देशुभवर्तमान : महिला सुरक्षा विभागाचे यश; सुशिक्षितांमध्ये वाढता कौटुंबिक कलह

नाशिक : समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.
सुशिक्षित समाजाचे विचार प्रगल्भ होत जातात, हे अगदी खरे आहे. मात्र काहींवर पारंपरिक विचारांचा पगडा असल्यामुळे शहरात अनेकविध सुशिक्षित कुटुंबांमधील कलह चव्हाट्यावर येतात. कुटुंबाची बसलेली घडी विस्क टली जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून शरणपूररोड येथील सिग्नलजवळ महिला सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कौटुंबिक कलह व त्यामधून दोन कुटुंबांच्या नातेसंबंधात आलेले वितुष्ट कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न महिला पोलीस
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जातो मागील वर्षभरात ६५० पीडित महिलांकडून तक्रारींचे अर्ज महिला सुरक्षा विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार महिलेचे सासर व माहेरच्या नातेवाइकांना बोलावून घेत त्यांची गाºहाणी समजून घेतली गेली तसेच पती-पत्नीलाही बोलावून त्यांचे स्वतंत्ररीत्या म्हणणे ऐकून घेत दोन्ही बाजूंच्या लोकांचा खास करून पती-पत्नीचे समुपदेशनावर अधिकाधिक भर देत एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला
जातो.
महिलांना कायद्याचे सामान्यज्ञान
शहरात शिक्षणाचे प्रमाण चांगले असून, महिला आपले हक्क, कर्तव्यांबाबत सजग असून, त्यांच्यामध्ये महिला सुरक्षाविषयक कायद्यांचे सामान्यज्ञानही दिसून येत असल्याचे डौले यांनी सांगितले. त्यामुळे समुपदेशन करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. प्राप्त झालेल्या ६५० अर्जांपैकी बहुतांश अर्ज हे सुशिक्षित कुटुंबांचे आहेत.
अशी आहेत कारणे
महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक तक्रारी, वंध्यत्वाची समस्या, माहेरून पैशांची मागणी, मुलींचाच होणारा जन्म, पतीची व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान नसणे अशी अनेकविध कारणे वैवाहिक जोडप्यांच्या कलहामागील असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गैरसमजुतींमधून व न्यूनगंडापोटी पती-पत्नी किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन नातेसंबंध
धोक्यात सापडतात.

Web Title: Police lost five years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.