प्रवासी व्यापाऱ्याची लूट

By Admin | Published: June 21, 2017 01:20 AM2017-06-21T01:20:48+5:302017-06-21T01:21:20+5:30

प्रवासी व्यापाऱ्याची लूट

The plunder of a travel merchant | प्रवासी व्यापाऱ्याची लूट

प्रवासी व्यापाऱ्याची लूट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : शालिमारयेथून नाशिकरोडला रिक्षातून येणाऱ्या व्यापाऱ्याला उपनगरजवळ दमदाटी करून मारहाण करीत जबरी लूट करणाऱ्या पंचवटी फुलेनगर भागातील तीन संशयितांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.
लासलगाव येथील शास्त्रीनगर येथे राहणारे व्यापारी अनिलकुमार कांकरिया (३३) यांचे शालिमार येथे आयुष एंटरप्राईजेस नावाचे दुकान आहे. कांकरिया हे सोमवारी रात्री शालिमार येथून नाशिकरोडला येण्यासाठी रिक्षा (एमएच १५, झेड ९९२०) मध्ये बसले. त्यांच्यासोबत आणखीन दोन युवक रिक्षामध्ये बसले. उपनगर शांती पार्कच्या रस्त्याला रिक्षा आणून रिक्षाचालक व इतर दोघांनी कांकरिया यांना मारहाण करत त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी, मोबाइल रोख रक्कम असा एकूण २२ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरी करून त्यांना रिक्षातून उतरवून देत पोबारा केला.
या प्रकारानंतर कांकरिया यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. फियादीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी वापरलेली रिक्षा व संशयितांच्या वर्णनावरून सोनू डॅनियल खंडारे (२५), अजय सुनील जिवडे (२३), मदन बाळकृष्ण गायकवाड (२१) सर्व रा. कालिकानगर फुलेनगर, पंचवटी या तिघा संशयितांना अटक केली आहे.

Web Title: The plunder of a travel merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.