पिंपळगाव बसवंत येथे दोन वळूंची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 05:48 PM2019-06-06T17:48:44+5:302019-06-06T17:48:51+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लॉन्स समोर सकाळी नऊ वाजता दोन भले मोठे वळू एकमेकांना भिडले. त्यांची ही ...

 Pimpalgaon Baswant with two Bull battles | पिंपळगाव बसवंत येथे दोन वळूंची झुंज

पिंपळगाव बसवंत येथे दोन वळूंची झुंज

Next
ठळक मुद्देनागरिकांची धावपळ : अग्निशमन दलाने केली मध्यस्थी


पिंपळगाव बसवंत : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लॉन्स समोर सकाळी नऊ वाजता दोन भले मोठे वळू एकमेकांना भिडले. त्यांची ही झुंज पाहून अनेकांनी लांबूनच आपली वाहने वळविली, तर काही जण करमणूक म्हणून बघू लागले. बघता बघता ही झुंज दीड तास चालू होती. अखेर ही झुंज उंबरखेड चौफुलीपर्यंत आली व नागरिकांची धावपळ सुरू झाली. यातच चार ते पाच मोटारसायकलस्वारांनी वाहन सोडून पळ काढला. परिस्थिती हाताबाहेर जात होती व ही झुंज सुटत नसल्याने अखेर पुढील मोठा अनर्थ टाळण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीची अग्निशमक टीम घटनास्थळी दाखल झाली. पंधरा ते वीस मिनिटे पाण्याचा मारा केल्यावर अखेर या मारामुळे या दोन वळूंची ताटातूट करण्यात यश मिळविले. आजपर्यंत अग्निशमन दलाने अनेक आगींच्या प्रसंगी नियंत्रण मिळविले. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे तर झाडावर अडकलेल्या माणसालादेखील खाली उतरविले; पण या मुक्या जनावरांचे भांडण सोडवून परिसर कसा शांत करायचा हे मात्र मोठे आव्हान होते; पण अग्निशामक दलाच्या चतुराईने या दोन वळूंच्या झुंजीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. यावेळी नागरिकांनी अग्निशामक दलाचे आभार मानले.
फोटो ओळी
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी मारून त्या दोन वळूंचे भांडण सोडवून बाजूला करण्यासाठी केलेली धडपड. (06पिंपळगाव झुंज)

Web Title:  Pimpalgaon Baswant with two Bull battles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.