रस्त्यावर वाहने उभी केल्यास तासाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:07 AM2019-03-31T01:07:01+5:302019-03-31T01:07:20+5:30

रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची टाळण्यासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याने नवीन परिपत्रक जारी करून, या पुढे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरु द्ध कडक धोरण जाहीर केले आहे.

 Penalties for roads if roads were parked | रस्त्यावर वाहने उभी केल्यास तासाला दंड

रस्त्यावर वाहने उभी केल्यास तासाला दंड

googlenewsNext

नाशिक : रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची टाळण्यासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याने नवीन परिपत्रक जारी करून, या पुढे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरु द्ध कडक धोरण जाहीर केले आहे. जितक्या वेळ वाहन रस्त्यावर उभे केले जाईल त्याला ताशी दंड आकारण्यात येणार आहे. या धोरणाची तत्काळ अंमलबाजवणी करण्याचे ठरविण्यात आले आहे
अशा प्रकारचे धोरण लागू करण्यामागे सध्या प्रमुख महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे कामे सुरू असून, त्यामुळे सुरळीत रस्ता वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, त्यासाठी काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात येते, तर काही ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे, अशा वेळी रस्त्यात वाहने उभी करणाऱ्यांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. परिणामी वाहतूक कोंडी होऊन त्याचा साऱ्यांनाच त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे अशा रस्त्यावर अडथळा ठरणारी, भंगार, बेवारस वाहने, बेकायदेशीर पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार सरकारच्या या नवीन धोरणाने राज्यातील पोलीस, महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जो कोणी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतेही वाहन सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे उभी करेल, त्याला ते वाहन जोपर्यंत उभे असेल तोपर्यंत प्रत्येक तासाला ५० रु पये दंड केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे, परंतु अपघात झालेले वाहन असेल तर त्याची कायदेशीर बाबी पूर्ण करून सदरचे वाहन सरकारच्या वतीने रस्त्यातून हलविण्यात येईल, मात्र त्यासाठी येणारा खर्च व दंड वाहनमालकाकडून वसूल करण्याची तरतूदही या धोरणात करण्यात आली आहे.

Web Title:  Penalties for roads if roads were parked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.