उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल  

By श्याम बागुल | Published: May 27, 2023 03:46 PM2023-05-27T15:46:04+5:302023-05-27T15:46:16+5:30

निकालात कमी गुण मिळाल्याने कृष्णाली हिने राहत्या घरातच दुपारी विषारी औषध सेवन केले

Passed but scored less; In Nashik The extreme step taken by the 12th student commit Suicide | उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल  

उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल  

googlenewsNext

सिडको - बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविल्याची घटना कामटवाडे परिसरातील वृंदावन नगर भागात घडली. कृष्णाली अनिल साबळे (१८, रा. लोटस् आशीर्वाद पार्क, वृंदावननगर) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

कृष्णाली साबळे ही शहरातील महाविद्यालयात बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी दोन वाजता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. निकालात कमी गुण मिळाल्याने कृष्णाली हिने राहत्या घरातच दुपारी विषारी औषध सेवन केले. काही वेळाने तिची प्रकृती बिघडल्याचे घरच्यांच्या निदर्शनास आले. यावेळी उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री १० वाजता कृष्णालीचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णाली साबळे हिच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.

Web Title: Passed but scored less; In Nashik The extreme step taken by the 12th student commit Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.