वडांगळी येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:41 PM2019-06-30T17:41:48+5:302019-06-30T17:42:01+5:30

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहारात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.

Parents-Teacher Meetings at Vadangali | वडांगळी येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

वडांगळी येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

Next

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहारात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.
भाऊसाहेब चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपसरपंच किशोर खुळे, शालेय समिती सदस्य दीपक खुळे, शिवाजी खुळे, माधव खुळे, डॉ. अडसरे, गिरीश ठोक, प्रवीण बर्वे, विक्रम खुळे आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवी किरण भावसार यांचा सत्कार शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्याचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक संघाच्या उपाध्यक्षपदी योगेश घोटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विभाग प्रमुख राजेंद्र भावसार यांनी प्रास्ताविक केले. आवारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्राध्यापक तांबे, पर्यवेक्षक कडलग, मुख्याध्यापक नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालक, महिला पालक व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Parents-Teacher Meetings at Vadangali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.