शिक्षक मतदारसंघात ‘पालघर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:18 AM2018-06-05T01:18:31+5:302018-06-05T01:18:31+5:30

पालघर निवडणूक विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

 Palghar pattern in teacher's constituency | शिक्षक मतदारसंघात ‘पालघर पॅटर्न’

शिक्षक मतदारसंघात ‘पालघर पॅटर्न’

Next

नाशिकरोड : पालघर निवडणूक विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.  नाशिक शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनिकेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोटवाणी रोड उत्सव मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, पालघर निवडणूक म्हणजे भाजपाचे नवीन व्हर्जन आहे. पालघर व्हर्जनचा पुरेपूर वापर शिक्षक निवडणुकीत करून घेतल्यास आपण विजयी नक्की होऊ असे महाजन यांनी स्पष्ट केले. पालघर निवडणुकीत प्रतिकूल परिस्थती असतानाही विजय खेचून आणला. या ठिकाणी जर अनुकूल परिस्थिती असून, आपल्या संघटन पातळीवर प्रचार करून शिक्षक मतदारसंघ जिंकावाच लागेल. विधान परिषदेत बहुमताची गरज असल्याने भाजपाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे निवडणूक असल्याने चांगले नियोजन करून ही निवडणूक जिंकावी लागेल, असे आवाहन महाजन यांनी केले.  राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शिक्षक व संस्थांना आपले प्रश्न भाजपा सोडवेल असा विश्वास आहे. वरच्या सभागृहात बहुमतासाठी तंत्र शुद्ध नियोजन करून या निवडणुकीत विजय मिळवावा लागेल, असे आवाहन प्रा. शिंदे यांनी केले. यावेळी उमेदवार अनिकेत विजय नवल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, महापौर रंजना भानसी, मनपा स्थायी सभापती हिमगौरी आहेर, उदय वाघ, बबन चौधरी, भानुदास बेरड, दिनकर पाटील, संभाजी मोरुस्कर आदींसह पाच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षांत सत्तेत असल्याने जनहितार्थ अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. मात्र राज्यसभेत विरोधी पक्ष काँग्रेसकडे बहुमत असल्याने आपल्या निर्णयाची अमंलबजावणी उशिराने झाली. त्यामुळे राज्यसभा व विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी शिक्षक मतदारसंघात सर्वांनी एकदिलाने काम करून यश मिळावावे.  - जयकुमार रावल,  पर्यटन राज्यमंत्री

Web Title:  Palghar pattern in teacher's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.