पाणी कमी असल्याने सिंचन पद्धतीने कांदा लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:38 PM2018-11-21T16:38:46+5:302018-11-21T16:39:33+5:30

खामखेडा : चालु वर्षी उन्हाळी कांद्याला चागला भाव मिळाल्याने सध्या परिसरात कांदा लागवडी करण्यात शेतकरी धावपळ कार्यमग्न असल्याचे दिसून येत आहे.

Onion cultivation irrigation method due to low water | पाणी कमी असल्याने सिंचन पद्धतीने कांदा लागवड

पाणी कमी असल्याने सिंचन पद्धतीने कांदा लागवड

googlenewsNext
ठळक मुद्दे त्यामुळे शेतकरी सिंचन पद्धतीचा मोठया प्रमाणात करीत आहे.

खामखेडा : चालु वर्षी उन्हाळी कांद्याला चागला भाव मिळाल्याने सध्या परिसरात कांदा लागवडी करण्यात शेतकरी धावपळ कार्यमग्न असल्याचे दिसून येत आहे.
चालु वर्षी उन्हाळी कांद्याला चागला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नजर आता उन्हाळी कांद्याकडे वळल्या आहेत. या वर्षी विहिरींना पाणी कमी असल्यामुळे शेतकरी आता पांरपारिक पद्धतीने शेती न करता अत्याधुनिक ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गादी वाफा पद्धतीने कांदा लागवड करतांना करताना दिसत आहेत. गादी वाफा पद्धतीने म्हणजे वाफा तयार न करता दोन ते अडीच फूट रुंद आणि दीड फुट उंचीचा वाफा तयार करून त्यावर कांदा लागवड केल्यानंतर त्यावर ठिबकची नळी वाफ्याच्या मथ्यावर पसरु न त्या नळीस ठराविक अंतरावर ठिबक जोडण्यात येतात म्हणजे ठिबकद्दारे पाणी सोडल्यावर वाफा पूर्णपणे ओला झाला पाहिजे. सध्या विजेचे भारनियम असल्याने शेती पंपासाठी चोवीस तासापैकी फक्त आठ तास विद्युत प्रवाह मिळतो. त्यात अनेक वेळा लाईट ये-जा करते. तसेच या ठिबक सिंचन मुळे पिकाला पाणी भरण्यासाठी माणूस लागत नाही. आणि पिकांना खते-खाद्यही या ठिबकच्या साह्याने देता येत असल्यामुळे पिकांना पाणीही कमी लागते. गादी वाफा या ठिबकच्या पाण्यामुळे जमीन भुसभुषीत राहते त्यामुळे कांद्याची गळतीही चांगली होते. त्यामुळे उत्पादन चांगल्या प्रमाणात येते. त्यामुळे आर्थिक आणि श्रमाबरोबर पाण्याची बचत होते .
तसेच काही शेतकरी तुषार सिंचन पद्धतीचा अवलब करतांना दिसून येत आहे. यामुळे पिकावर पाऊसासारखे पाणी पडते.परिणामीे पिकावर रोगाचा प्रदुर्भाव होत नाही आणि या तुषार सिंचनला पाणी तर कमी लागते त्याचबरोबर वीज बरोबर श्रामाची बचत होते. कमी पाण्यामघ्ये भरघोस उत्पादन येते. त्यामुळे शेतकरी सिंचन पद्धतीचा मोठया प्रमाणात करीत आहे.
कांदा लागवडीसाठी मजुराची मोठया प्रमाणात कमतरता भासत आहे.आता पूर्वी सारखे रोजनदारीने माणसे कामाला येत नाही तसेच विजेअभावी कांदा लागवड मक्तता पध्दतीने द्यावी लागत आहे .कारण आठवड्यात तीन दिवस रात्र तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यत लाईट आसते तेव्हा सकाळी लवकर कांदा लागवडीसाठी नऊ वाजेपर्यत काम करतात पुन्हा पाच वाजेनंतर कांदा लागवड करतात पाच वाजेनंतर लागवड केलेला कांद्याला रात्र लाईट आल्यावर पाणी देतात .तसेच चार दिवस दिवसा नऊ ते पाच वाजेपर्यत लाईट असते तेव्हा माणसे सकाळी कामावर जाऊन दिवसभर कांदा लागवड करतात .आता सर्वत्र कांदा लागवडीचा मौसम असल्याने मजूर मिळत नाही .ज्या शेतकरीकडे स्वत: ची वाहन आहेत ते तर बाहेर गावाहुन मजूर आणत आहे. काही शेतकरी भाड्याने वाहन करून बाहेरून मंजूर अणत आहेत. काही रिक्षावाले तर मजुरांना सकाळी त्याचा गावाहुन शेतात सोडून दिवसभर धंदा करून सायंकाळी पुन्हा त्यांना त्यांच्या गावाला सोडतात .त्यांच्या त्यांना प्रति मंजूर भाडे शेतकºयाला दयावे लागते. त्यामुळे शेतकरी रिक्षावाल्याच्या संर्पकात असतात. यामुळे शिवारात सर्वत्र कांदा लागवड करतांना दिसून येत आहे.
फोटो : ठिबक सिंचन पध्द्तनी केलेली कांदा लागवड.

Web Title: Onion cultivation irrigation method due to low water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी