कालिका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नऊ मित्रांना कारची धडक; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 10:47 AM2018-10-14T10:47:59+5:302018-10-14T10:48:13+5:30

नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास वडाळा गावातील नऊ मित्र पायी जात होते. दरम्यान एक अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली.

one Death in Road Accident | कालिका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नऊ मित्रांना कारची धडक; एकाचा जागीच मृत्यू

कालिका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नऊ मित्रांना कारची धडक; एकाचा जागीच मृत्यू

Next

नाशिक - नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास वडाळा गावातील नऊ मित्र पायी जात होते. दरम्यान एक अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विशाल पवार (११) याचा जागीच मृत्यू झाला.  तर उर्वरित आठ मुले गंभीरपणे जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  साईनाथ नगर चौफुली लगत कार ने जोरदार धडक मुलांना दिली. या धडकेत वडळागावातील रहिवासी असलेल्या  १० ते १४ वयोगटातील मुले गंभीरपणे जखमी झाली आहेत. पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातानंतर करचालक घटनस्थळावरून पसार झाला. पहाटेची वेळ असल्याने जखमी मुलांना मदत उशीरा पोहचली. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाच्या वाहनात मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशाल नामदेव पवार (वय ११) राहणार वडाळागांव, कोळीवाडा ) याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात  साहिल खंडू कडाळे (वय१४), रोहन बापू मोरे (वय१२), कृष्णा दत्तू खोडे (वय९),राहूल बापू मोरे (वय१५), अश्विन दत्तू खोडे (वय१४), रुषिकेश सुनील वाघ (वय१०), तुषार गोविंद खाडम(वय १५) हे जखमी झाले आहेत.  याबाबतीत अधिक तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: one Death in Road Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.