सांस्कृतिक भवनासाठी एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:50 PM2018-08-14T17:50:44+5:302018-08-14T17:51:29+5:30

कळवण : नगरपंचायतच्या पुढाकाराने शहरात अत्याधुनिक सांस्कृतिक भवन साकारले जाणार असून त्यासाठी गणेशनगर भागातील जागेची निवड करण्यात आली असून जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनून एक कोटी रु पये मंजूर करण्यात आले आहेत. सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षात सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करण्यात येणार असून या कामासाठी ४७ लाख १७ हजार रुपयाचा निधी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कळवण प्रकल्प कार्यालयाकडे वितरीत केला आहे.

One crore funds for cultural building | सांस्कृतिक भवनासाठी एक कोटीचा निधी

सांस्कृतिक भवनासाठी एक कोटीचा निधी

googlenewsNext

नगरपंचायत हद्दीत मनोरंजन व करमणुकीची कुठल्याही प्रकारची साधने नसल्याने मनोरंजन व करमणुकीसाठी कळवणकरांना नाशिक, मालेगाव येथे जावे लागते हे लक्षात घेऊन कळवण नगरपंचायतच्या १७ नोव्हेंबर २०१७ व १४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी शासन स्तरावरुन एक कोटी रुपयांचा निधी मिळावा व शहरातील गणेशनगर भागातील गट नंबर १८७/३५ मध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे असा ठराव करण्यात आला.
कळवण नगरपंचायत हद्दीत सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे यासाठी कळवण नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्ष सौ. सुनीता पगार यांनी पुढाकार घेऊन शासनस्तरावर व सहाय्यक जिल्हाधिकारी अमन मित्तल व प्रशासकीय यंत्रणेकडे पत्रव्यवहार करु न प्रस्ताव सादर केला असल्याने जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कळवण नगरपंचायतच्या प्रस्तावित सांस्कृतिक भवनासाठी एक कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देऊन ४७ लाख १७ हजार रु पयांचा निधी कळवण प्रकल्प कार्यालयाकडे वितरीत केल्याने कळवणकरांचे स्वप्न दोन वर्षांत साकारणार आहे.
माजी उपनगराध्यक्ष, नगरसेविका सौ भाग्यश्री पगार यांच्या प्रभाग क्र मांक तीनमध्ये गणेशनगर भागातील स्वामी विवेकानंद कॉलनीत नगरपंचायतच्या १६ हजार स्केअरफूट जागेपैकी ६ हजार स्केअरफूट जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. २०० प्रेक्षक बसू शकतील असे प्रेक्षकगृह, साऊंडप्रुफ व वातानुकूलित व्यवस्था या सांस्कृतिक भवनात तयार करण्यात येणार असून वाहनतळाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मयुर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी सांगितले.

Web Title: One crore funds for cultural building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.