काळाराम मंदिरात आढळल्या पुरातन पायऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:31 AM2019-06-21T01:31:22+5:302019-06-21T01:31:42+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू असताना करण्यात येत असलेल्या रस्ता खोदाईदरम्यान साडेचार फूट खोलीच्या दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे.

The oldest steps found in the temple of Kalamar | काळाराम मंदिरात आढळल्या पुरातन पायऱ्या

काळाराम मंदिरात आढळल्या पुरातन पायऱ्या

Next
ठळक मुद्देनागरिकांत कुतूहल : चबुतरा असण्याची शक्यता; बघ्यांची वाढली गर्दी

पंचवटी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू असताना करण्यात येत असलेल्या रस्ता खोदाईदरम्यान साडेचार फूट खोलीच्या दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे. काही दिवसांपासून राम मंदिर परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. गुरुवारी खोदकाम करताना पायºया आढळून आल्यानंतर काम थांबविण्यात येऊन रात्री पुन्हा पूर्व दरवाजा बाहेर रस्त्याचे खोदकाम केले जाणार आहे, असे काळाराम संस्थानच्या वतीने विश्वस्तांनी सांगितले.
शेकडो वर्षांपूर्वी उभारलेल्या काळाराम मंदिराबाहेर आढळून आलेल्या जुन्या पायºया पूर्वीच्या मूळ बांधकामाच्या वेळच्या असल्याचे बोलले जात आहे तर पूर्वी या ठिकाणी पायºया तसेच बसण्यासाठी पूर्व दरवाजाजवळ अडीच ते तीन फुटाचा ओटा असल्याचे जुन्या नागरिकांनी सांगितले. राम मंदिराबाहेर खोदकाम करत असताना पायºया आढळून आल्याचे मेसेज व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेकडो नागरिकांनी जुन्या पायºया बघण्यासाठी गर्दी केली होती. खोदकाम चालू असताना पायऱ्यांच्या ठिकाणी एक लोखंडी नालदेखील आढळून आली आहे तर मुख्य पूर्व दरवाजाच्या दोन्ही बाजूला अडीच ते तीन फुटापर्यंत दगडी ओटे असल्याचे आढळून आले.
गुरुवारी रात्रीपासूनच पुन्हा मंदिरासमोरचा रस्ता खोदकाम केल्यानंतर चबुतरा तसेच पायºया आढळून येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. साडेचार फूट खोलीपर्यंत पायºया आढळून आल्याने पूर्वी परिसरात रस्ता असावा व त्यानंतर वारंवार त्याठिकाणी दगड-माती यांची भर टाकली गेल्यानंतर पायºया पूर्णपणे बुजल्या गेल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्व दरवाजाजवळ दोन्ही बाजूला दगडी ओटे असल्याने त्याठिकाणी बसण्याची जागा होती हे निश्चित झाले आहे. रात्री मंदिर परिसर समोरील रस्ता खोदकाम करण्यात येणार असून, त्यानंतरच पायºयांचे गूढ उकलले जाईल, असे मंदिराचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले.

Web Title: The oldest steps found in the temple of Kalamar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.