पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले : रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:38 AM2019-05-19T00:38:31+5:302019-05-19T00:38:46+5:30

सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली.

The official forgot the meaning of 'trusted': Ranade | पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले : रानडे

पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले : रानडे

googlenewsNext

नाशिक : सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली.
गोदाकाठावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत ते शनिवारी (दि.१८) उद्योजक रामनाथ चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आठवे पुष्प गुंफताना विनायक रानडे यांची तन्वी अमित यांनी मुलाखत घेत त्यांना ‘ग्रंथ तुमच्या दारी, एक चळवळ-देशात, विदेशांत’ विषयावर बोलते केले. विनायक रानडे म्हणाले, आर्थिक, अंतर, वेळ अशा विविध कारणांनी वाचनालयात येऊ न शकणाऱ्या वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचावीत यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना सुरू केली असून, याची सुरुवात परिचयातील व्यक्तींच्या आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी होऊन मिळणाºया देणगीतून वाचकांना आनंदी करण्याच्या कल्पनेतून झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना कार्यकर्त्यांमुळे यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. शंकर बोºहाडे यांनी दिवंगत रामनाथ चांडक यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नाट्य दिग्दर्शक व अभिनेता सचिन शिंदे, हिरालाल परदेशी, राजेंद्र बाफना, नीलेश भुतडा, संजय परांजपे आदी उपस्थित होते.

Web Title: The official forgot the meaning of 'trusted': Ranade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.