फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाशिकमध्येही कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:36 PM2018-04-14T14:36:29+5:302018-04-14T14:36:29+5:30

कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लोकांना आकर्षित केले.

The office of cheating company also in Nashik | फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाशिकमध्येही कार्यालय

फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाशिकमध्येही कार्यालय

Next
ठळक मुद्देदामदुपटीचे अमिष : कोपरगाव, लासलगावी गुन्हा दाखलतक्रार करणा-या तरूणीलाच भ्रमणध्वनीवरून धमकविण्याचा प्रकार

नाशिक : गुंतवणुकीवर कमी वेळेत दामदुप्पट देण्याचे अमिष दाखवून कोपरगाव येथील २१ गुंतवणूकदारांना सुमारे दोन कोटी रूपयांना गंडा घालणा-या व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस या कंपनीच्या तिघा भामट्यांनी निफाड तालुक्यातील विंचूर येथील शेतक-याचीही सुमारे ५६ लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता याच कंपनीचे नाव बदलून नाशकातील द्वारका चौकात ‘सक्सेस ट्री’ या नावाने नवीन शाखा उघडून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या या टोळीच्या विरोधात तक्रार करणा-या तरूणीलाच भ्रमणध्वनीवरून धमकविण्याचा प्रकारही घडला आहे.
कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लोकांना आकर्षित केले. गुंतवणुकीतून कोपरगाव शहरात मोक्याच्या जागा घेतल्याचे दाखवून अधिकाधिक लोकांना त्यापासून फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखविले व्हिनस कॅपीटल प्रमाणेच त्यांनी सुखसाई तालुका नागरी सहकारी पतसंस्था या नावानेही दुसरी कंपनी सुरू करून सहा महिन्यात पैसे गोळा केले. गावातील सुमारे २७ लोकांनी २ ते २५ लाखापर्यंतची गुंतवणूक केली व त्याच्या मोबदल्यात कंपनीने धनादेश दिले परंतु धनादेश न वटल्याने गुंतवणुकदारांनी तगादा लावताच त्यांनी कंपनी बंद करून पोबारा केला. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार विंचूर येथील रविंद्र मल्हारी दरेकर (४२) यांच्याबाबत घडला आहे. त्यांनी देखील ५४ लाख रूपयांची गुंतवणूक केली परंतु मुदतीत कंपनी त्यांचा पैसा परत न करू शकल्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रविण वरगुडे, राजेंद्र जेजुरकर, दिगंबर बैरागी यांच्याविरूद्ध लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना गंडविल्यानंतर आता व्हिनस कॅपीटल कंपनीने नाव बदलून नाशिक शहरातील द्वारका येथे बोडके प्लाझा या इमारतीत ‘सक्सेस ट्री’ या नावाने कंपनी सुरू केल्याची तक्रार सौ. अस्मिता प्रमोद देशमाने यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या कंपनीकडून नागरिकांची फसवणूक केली जात असून, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही सौ. देशमाने यांनी केली आहे.

Web Title: The office of cheating company also in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.