शासकीय कामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:40 PM2019-04-03T23:40:47+5:302019-04-03T23:41:15+5:30

सिन्नर : सिन्नर पोलीस ठाण्यात दंगा करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीच्या भांडणात समन्वय घडवून आणणाऱ्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण करून पोलीस ठाण्यात धुमाकूळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.

Obstruct government work | शासकीय कामात अडथळा

शासकीय कामात अडथळा

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील टेबल खुर्च्यांची आदळआपट करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

सिन्नर : सिन्नर पोलीस ठाण्यात दंगा करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीच्या भांडणात समन्वय घडवून आणणाऱ्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण करून पोलीस ठाण्यात धुमाकूळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.
तू आता पोलिसांत तक्रार दिली आहे. सकाळपर्यंत तुझा मर्डर करतो असे म्हणून पती ज्ञानेश्वर उत्तम बोडके यांनी पत्नी मनीषा हिस बोलून मारण्यासाठी धावला. पत्नीला मारण्यास धावून जात असताना पोलीस कर्मचारी मच्छिंद्र पिठे यांनी ज्ञानेश्वरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. उलट पोलीस कर्मचाºयाची गच्ची पकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हाताच्या चापटीने मारहाण करण्यासह शासकीय गणवेशाचे नुकसान केले. यावेळी भाऊ संदीप व सोपान यांनी आम्ही पण पोलीस आहोत, तू कशी नोकरी करतो तेच दाखवितो असे बोलून दमदाटी केली.
याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी या सात संशयितांविरोधात शासकीय कामात अडथळा व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे अधिक तपास करीत आहेत. पोलीस शिपाई शार्दूल यांच्या हातातून मोबाइल घेऊन तो जमिनीवर आपटून नुकसान केले. ज्ञानेश्वर बोडके यांच्या मदतीला आलेले नातेवाईक संशयित दीपक शेळके, सोपान बोडके, समाधान बोडके, तुषार बोडके, संदीप बोडके, उत्तम बोडके (सर्व रा. जामगाव, ता. सिन्नर) यांनी मिळून पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील जनरेटरच्या टाकीचे झाकण फेकून मारल्याचा प्रकारही यावेळी घडला. पोलीस ठाण्यातील टेबल खुर्च्यांची आदळआपट करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

Web Title: Obstruct government work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.