आता वनविकास महामंडळकडूनच ‘लेझर शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:14 AM2018-03-06T01:14:27+5:302018-03-06T01:14:27+5:30

पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानातील बोलक्या वृक्षांचा लेझर शो आता वनविकास महामंडळाच्या कर्मचाºयांकडूनच चालवला जाऊ लागला असून, त्यामुळे कंत्राटदार कंपनीला द्यावयाचे लाखो रु पये वाचणार आहेत. महामंडळाच्या पाच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. त्यांनी पूर्वीच ठरल्याप्रमाणे एक मार्चपासून शो आॅपरेटर करणे सुरू केले आहे.

 Now the 'Leisure Show' | आता वनविकास महामंडळकडूनच ‘लेझर शो’

आता वनविकास महामंडळकडूनच ‘लेझर शो’

Next

पाथर्डी फाटा : पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानातील बोलक्या वृक्षांचा लेझर शो आता वनविकास महामंडळाच्या कर्मचाºयांकडूनच चालवला जाऊ लागला असून, त्यामुळे कंत्राटदार कंपनीला द्यावयाचे लाखो रु पये वाचणार आहेत. महामंडळाच्या पाच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. त्यांनी पूर्वीच ठरल्याप्रमाणे एक मार्चपासून शो आॅपरेटर करणे सुरू केले आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने नाशिक मनपा व वनविकास महामंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने नेहरू वनोद्यानात बोलक्या वृक्षांचा लेझर शो सव्वा वर्षांपूर्वी साकारण्यात आला; पुण्याच्या गार्डियन कंपनीला एका वर्षाचा करार करून तो चालविला जात होता. डिसेंबरअखेर करार संपल्यानंतर कंपनीने शो आॅपरेट करणे बंद केले होते.  एक महिनाभर शो बंद राहिल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी वनविकास महामंडळाच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन महामंडळाच्याच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन शो चालविण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी गार्डियन कंपनीच्या तंत्रज्ञानी एक महिन्यात प्रशिक्षण देऊन बाहेर पडावे असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे महिन्यानंतर एक फेब्रुवारीला शो पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला.  या एक महिन्यात महामंडळाच्या पाच कर्मचाºयांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ठरल्याप्रमाणे करारदार कंपनीचे कर्मचारी फेब्रुवारीअखेर माघारी गेले आहेत. त्यांना देण्यात  येणार लाखो रु पयांचा मोबदल्याचा खर्च वाचणार आहे.

Web Title:  Now the 'Leisure Show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक