निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:01 AM2019-03-02T02:01:23+5:302019-03-02T02:02:35+5:30

लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत टळून गेल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित रिक्तपदे भरण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना बहाल केले आहेत.

Now the Commissioner has the right to fill elections | निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना

निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना

Next
ठळक मुद्देवरातीमागून घोडे : राज्य सरकारच्या निर्र्णयावर टीका

नाशिक : लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत टळून गेल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित रिक्तपदे भरण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना बहाल केले आहेत. विशेष म्हणजे महसूल मंत्रालयाने राज्यातील सर्व पदे यापूर्वीच भरून टाकलेली असल्याने आता काढलेले आदेश म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे मानले जात आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या वर्षापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करून, निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाºयांकडून निवडणूक पूर्वतयारीची कामे करवून घेतली होती. मतदारांची अंतिम यादी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने निवडणुकीशी संबंधित कामे करणाºया अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार महसूल मंत्रालयाने राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या होलसेल बदल्या केल्या होत्या.
सोयीच्या बदल्या करवून घेण्यासाठी अधिकाºयांना मंत्रालयाच्या पायºया झिजविण्याबरोबरच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाºयांची मनधरणी करावी लागली होती. मोठ्या उलाढाली होऊन राज्यातील जवळपास सर्वच निवडणूक अधिकाºयांची पदे २८ फेब्रुवारीपर्यंत भरण्यात आली असून, तसा अहवालही निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. असे असताना गुरुवारी रात्री राज्याच्या महसूल मंत्रालयाने २६ फेब्रुवारीची मागील तारीख टाकून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, महसूल विभागातील अपर उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बदल्या, पदस्थापना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार आपल्या विभागातील फक्तलोकसभा निवडणुकीशी संबंधित पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास, निवडणूक कामकाजाशी संंबंधित नसलेल्या जिल्ह्णांतर्गत, विभागांतर्गत निवडणूक आयोगाच्या पात्र अधिकाºयांमधून पदस्थापना देऊन असे पद भरण्याबाबत अधिकार देण्यात येत आहे. असे या पत्रात नमूद केले
आहे.
व्हायरल पत्राद्वारे टीकास्त्र
महसूल खात्याचे सदरचे पत्र अधिकाºयांनीच सोशल माध्यमावर व्हायरल केले असून, या पत्राचा आधार घेऊन गेला महिनाभर महसूल मंत्रालयातील अधिकाºयांकडून बदल्यांच्या नावे केल्या गेलेल्या छळवणुुकीच्या घटनांना अधिकाºयांनी उजाळा दिला आहे. विभागीय आयुक्त जर बदल्या करण्यास सक्षम होते, तर तेव्हाच त्यांना अधिकार का दिले नाही? असा सवाल केला.

Web Title: Now the Commissioner has the right to fill elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.