निफाड तालुका महिला सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 04:18 PM2019-03-10T16:18:51+5:302019-03-10T16:19:27+5:30

सायखेडा : केवळ कुटुंबातील लोकांच्या हातातील बाहुले राहून चालणार नाही, तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या, नांदेड गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले. निफाड तालुका महिला सन्मान सोहळाप्रसंगी भेंडाळी येथे त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी वैशाली कदम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, दीप्ती वाजे, जि. प. सदस्य वैशाली खुळे, सुलभा पवार, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, रंजना पाटील, कमल राजोळे उपस्थित होत्या.

 Niphad Taluka Women's Honor ceremony | निफाड तालुका महिला सन्मान सोहळा

निफाड तालुका महिला सन्मान सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्दे भेंडाळीत सन्मान सोहळा : बचत गटांना साहित्य वाटप



सायखेडा : केवळ कुटुंबातील लोकांच्या हातातील बाहुले राहून चालणार नाही, तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या, नांदेड गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले. निफाड तालुका महिला सन्मान सोहळाप्रसंगी भेंडाळी येथे त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी वैशाली कदम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, दीप्ती वाजे, जि. प. सदस्य वैशाली खुळे, सुलभा पवार, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, रंजना पाटील, कमल राजोळे उपस्थित होत्या.
राजश्री पाटील पुढे म्हणाल्या की मेल्यानंतर आपल्यावर क्रि याकर्म करण्यासाठी वंशाला दिवा पाहिजे, असा अट्टहास करून स्त्रीभ्रूण हत्या होते. मुलगा असो की मुलगी त्याच्या कर्तृत्वाने त्याची ओळख निर्माण होते, स्त्री परंपरेचा मोठा इतिहास जगाला आहे. नारी सर्वत्र पूज्यते अशी वैश्विक विचारधारा आहे. महिलांचा सन्मान करून महिला दिन आज जागतिक स्तरावर उत्सव बनू पाहत असला तरी पुरु ष प्रधान संस्कृतीतील अनेक लोकांना हे न पटणारे आहे. त्यामुळे महिलांनी कोणी आपला महिला म्हणून सन्मान करावा, अशी अपेक्षा करण्याऐवजी आपले कार्य पाहून सन्मान केला पाहिजे, अशी उत्तुंग भरारी घ्यावी, निसर्गाने पुरु षांपेक्षा मातृत्वाचा अवयव जास्त देऊन क्षमता सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
निफाड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी काथरगाव येथील शीतल काळे या महिला खेळाडूची श्रीलंकेत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पती यात नसल्याने निराधार महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आमदार अनिल कदम यांच्या वतीने ३१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असलेल्या तालुक्यातील १५० बचत गटांना शेगडी, पातेले, झाकनी यांचे वाटप केले. महिला सबलीकरनाच्या दृष्टीने आमदार अनिल कदम यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने राबविलेल्या स्तुत्य उपक्र माला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, प्रांत अधिकारी अर्चना पठारे, सारिका डेर्ले यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्र माचे प्रास्ताविक आमदार अनिल कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन पेठेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार वैशाली कदम यांनी मानले.
चौकट
सन्मान करण्यात आलेल्या महिला
सन्मानित महिला
शीलाताई दिलीप दिघे,
दीपाली अभिजित सुरळीकर,
अनुपमा नरेंद्र डेर्ले,
अमृता वसंत पवार,
मनीषा रोहिदास डावखर,
नेहा प्रभाकर खरे,
पूनम सुरेश धिंगाने,
शीतल विनोद चव्हाण-सनेर,
वैशाली वसंत भटमुळे,
सुरेखा संपत खालकर,
कांचनमाला खंडेराव हुजरे,
डॉ. सारिका विजय डेर्ले,
डॉ. रूपाली श्रीधर वाघ,
अ‍ॅड. अफरोज मोईनवाज शेख,
अ‍ॅड. हर्षाली बबन ठुबे,

फोटो : भेंडाळी येथे निफाड तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मानप्रसंगी नांदेडच्या व्याख्यात्या राजश्री पाटील, वैशाली कदम, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, दीप्ती वाजे व सन्मानित महिला.(10भेंडाळी सन्मान)

Web Title:  Niphad Taluka Women's Honor ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.