नाट्य सादरीकरणाचा निधी वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:25 AM2018-11-16T01:25:55+5:302018-11-16T01:26:21+5:30

शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकांच्या रकमा मोठ्या असल्या तरी सादरीकरणासाठी मिळणारा निधी अत्यल्प असून, सादरीकरणाचा निधी सहा हजारहून दहा हजार रुपये करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले आहे.

The need to increase funding for theatrical presentation | नाट्य सादरीकरणाचा निधी वाढविण्याची गरज

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य परिषदेच्या शुभारंभाप्रसंगी दीपप्रज्वलन करताना मध्यवर्ती नाट्य परिषदेचे नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी. समवेत दीप चहांदे, मानसी राणे, प्रा. रवींद्र कदम, धनश्री क्षीरसागर, मीना वाघ, राजेश जाधव आदी.

Next
ठळक मुद्देरवींद्र कदम : राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ

नाशिक : शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकांच्या रकमा मोठ्या असल्या तरी सादरीकरणासाठी मिळणारा निधी अत्यल्प असून, सादरीकरणाचा निधी सहा हजारहून दहा हजार रुपये करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ५८व्या राज्य हौशी मराठी नाट्य परिषदेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मध्यवर्ती नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक मानसी राणे, दीप चहांदे, श्रीराम धुमणे, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, मीना वाघ आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर अंबिका चौक मित्रमंडळ व सामाजिक संस्था नाशिकतर्फे ‘प्रियांका आणि दोन चोर’ नाटकाचे सादर करण्यात आले. यात वैशाली देव यांनी प्रियांकाची तर हेमंत गव्हाणे व अमोल थोरात यांनी चोराची भूमिका रंगवली.

Web Title: The need to increase funding for theatrical presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.