कांदाप्रश्नी चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:45 PM2018-12-11T16:45:41+5:302018-12-11T16:46:37+5:30

चांदवड : शेतमालाला हमी भाव देण्याची मागणी, कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध चांदवड - कांदा व अन्य शेतीमालाला हमीभाव ...

NCP's Radaroko on moonlight | कांदाप्रश्नी चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

कांदाप्रश्नी चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

Next

चांदवड : शेतमालाला हमी भाव देण्याची मागणी, कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध
चांदवड - कांदा व अन्य शेतीमालाला हमीभाव जाहीर करुन दिलासा द्यावा या मागणीसाठी चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने मुंबई -आग्ररोडवर पेट्रोलपंप चौफुलीवर मंगळवारी सकाळी अर्धातास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ,डॉ. भारती पवार,माजी आमदार जयंत जाधव, तालुका अध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड,कादवाचे संचालक सुखदेव जाधव, खंडेराव आहेर, विजय जाधव आदिनी केले. यावेळी नायब तहसीलदार मिनाक्षी गवळी, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसुल होत नाही. सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन कांदा व अन्य शेतमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करुन कांद्याचे निर्यात मुल्य शुन्य असतांना देखील कांद्याला १५० ते २०० रुपये क्विंटल एवढी कवडीमोल किमंत मिळत आहे. शेतमालाचे दर वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर राहावे यासाठी सरकारतर्फे बाजार हस्तक्षेप योजना राबवुन दर खाली आणले जातात. त्याचप्रमाणे कांद्याचे भाव अत्यंत कमी झले आहेत. शेतकºयांचे उत्पादन शुल्क देखील वसुल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हयात शेतकºयांचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवुन कांद्याला किमान २००० रुपये हमी भाव जाहीर करावा अन्यथा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस कमेटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
आंदोलनात प्रेरणा बलकवडे,बाळासाहेब कर्डक,युवक जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलक,राधाकृष्ण सोनवणे, सुनील आहेर, संजय बनकर, जितेंद्र आहेर, राजू पगारे, राईस फारूकी, संजय भाबर, रघुनाथ अहेर, शहाजी भोकनळ, उत्तम आहेर, अल्ताप तांबोळी, प्रकाश शेळके, निवृत्ती घाटे,अरु ण न्याहारकर,खंडेराव अहेर, सुनील कबाडे, अमोल भालेराव,रिजवान घासी,अ‍ॅड. नवनाथ अहेर,तुकाराम सोनवणे, नवनाथ जाधव, अनिल पवार, बाळासाहेब माळी, विजय जाधव,अनिल काळे, दत्तात्रय वाकचौरे, अनिल पाटील,महेश न्याहारकर, सौरभ ठाकरे, आबा ठाकरे, म्हसु गागरे, रुपम कोतवाल, राजाभाऊ भालेराव, कैलास गांगुर्डे,विजय गांगुर्डे, देवमन पवार, तुकाराम खैरे ,छबु गांगुर्डे आदिसह कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्व नेते व कार्यकर्ते चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत जमुन मोर्चाने रास्तारोको स्थळी गेले. यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील , पोलीस, राखीव जवानांनी , दंगा पथकांने चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: NCP's Radaroko on moonlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.