मनपा सयाजी शिंदे यांच्या मदतीने साकारणार देवराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:59 AM2019-01-13T00:59:40+5:302019-01-13T01:00:19+5:30

शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता देवराई प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी देवराई संवर्धनाचे काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. चालू वर्षापासूनच त्याची सुरुवात होणार असून, नव्या वर्षात देवराई फुललेली दिसेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

Nayarwai to come up with the help of Manpa Sayaji Shinde | मनपा सयाजी शिंदे यांच्या मदतीने साकारणार देवराई

मनपा सयाजी शिंदे यांच्या मदतीने साकारणार देवराई

Next
ठळक मुद्देसहा विभागात प्रकल्प : प्रदूषण रोखण्यासाठी गट वनीकरणावर भर्

नाशिक : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता देवराई प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी देवराई संवर्धनाचे काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. चालू वर्षापासूनच त्याची सुरुवात होणार असून, नव्या वर्षात देवराई फुललेली दिसेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
शहरात कितीही वनीकरण केले तरी वृक्षतोड अटळ असते. विशेषत: रस्त्याच्या कडेला असलेली झाडे रस्ता रुंदीकरणात तोडावीच लागतात. त्यामुळे महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागत असते. परंतु आता महापालिकेने गट वनीकरण म्हणजेच ब्लॉक प्लॅँटेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने सहा विभागात देवराई प्रकल्प साकारण्याची तयारी केली आहे. ग्रामीण भागात देवराई म्हणजे देवाची वनराई अशी संकल्पना असून, त्याठिकाणी देवाची मंदिरेही असतात. देवाचा वास असल्याने नागरिक या वनराईला धक्का पोहोचवत नाहीत. तसेच वृक्षतोड किंवा चराई टाळतानाच वनांचे संवर्धन करतात. झाडावरील फूलही तोडले जात नाही तर त्याऐवजी झाडावरून जे फूल खाली पडेल तेच देवाला अर्पण केले जाते इतकी देवराईची संकल्पना पवित्र आहे. शहरात अशाप्रकारची देवराई साकारल्यास त्या माध्यमातून वृक्षांचे संवर्धन होऊ शकेल, असा मनपाला विश्वास आहे.

वैशिष्ट्यपूर्ण झाडे...
देवराई प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने देशी प्रजातीच्या आणि विशेष करून धार्मिक महत्त्व असलेल्या मोठ्या प्रकल्पांची लागवड करण्यात येणार आहे. वड, उंबर, पिंपळ अशाप्रकारच्या झाडांचा त्यात सहभाग असेल. प्राणवायू देणाऱ्या झाडांची लागवड करून सहाही विभागात आॅक्सिजन हब तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Nayarwai to come up with the help of Manpa Sayaji Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.