कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:08 PM2018-10-10T16:08:32+5:302018-10-10T16:09:00+5:30

येवला: श्रीमहलक्ष्मी श्री महाकाली,श्री महासरस्वती मातेच्या रु पात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता रमेशगीरी महाराज यांच्या हस्ते जगदंबा मातेसमोर विधीपूर्वक घटस्थापना झाली. घटी बसणार भाविक यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

 Navratri festival of Jagdamba mother at Kotamgaon started | कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ

कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्दे  येवले तालुक्याचे दैवत असलेल्या माता जगदंबेचे दैवस्थान नासिक -औरंगाबाद महामार्ग लगत कोटमगाव येथे आहे. साडेतीन शक्तीपीठाइतकेच महत्व आसलेले हे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीन देवी एकत्रित आहेत.


येवला:
श्रीमहलक्ष्मी श्री महाकाली,श्री महासरस्वती मातेच्या रु पात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता रमेशगीरी महाराज यांच्या हस्ते जगदंबा मातेसमोर विधीपूर्वक घटस्थापना झाली. घटी बसणार भाविक यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी गुजराथी समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया रमेशचंद्र पटेल यांनी केलेल्या योगदानामुळे देवीचे रूप आणखीच खुलले आहे. देवीच्या मूळ चांदीच्या टोपावर तीन तांबड्या पांढऱ्या खड्याचे कुंदन, जगदंबा मातेच्या शिरकमलावर हिरा जडवलेली तीन मुकुट ,चांदीची बिंदी,मोत्याचे तीन हारदोन वर्षापूर्वी घटस्थापनेच्या दिवशी विजया पटेल यांनी विधिवत प्रदान केली होती. शिकागो डॉ.मीनल गुजराथी यांनी हिरवा मुनिया असलेली येवल्याची अस्सल पैठणी घटस्थापनेच्या दिवशी प्रदान केली. प्रभाकर झळके यांनी मोफत चरणसेवेचे सेवा भावी दालन सुरु के ली आहे.
दरवर्षी भाद्रपद आमवस्येच्या दुसº्या दिवशी अश्विन शुद्ध घटस्थापनेच्या शुभमुहार्तावर येथे नवरात्र उत्सव सुरु होतो.नासिक,औरंगाबाद,अहमदनगर,धुळ्यासह राज्यातून व परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होतात. बाहेर गावातील काही श्रद्धाळू नऊ दिवस घटी बसण्यासाठी मंदिर परिसरात मुक्काम करून राहतात नऊ दिवस उपवास करतात भजन ,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्र म सुरु असतात.
=
श्री क्षेत्र जगदंबा माता कोटमगाव देवस्थान येथे स्व.परेशभाई मित्र मंडळाच्या वतीने यंदा देवस्थानला नगारा भेट दिल्याने संगीत व लयबद्ध आरती आजपासून सुरु झाली आहे.मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रज्वल पटेल,गोपाळ काबरा, कैलास काबरा, संजय रोडे, विजय चंडालिया, बालू परदेशी,दीपक बूब,विजय चंडालिया,अमरजीतिसंग महल,विठ्ठल परदेशी हे उपस्थित होते.
 

Web Title:  Navratri festival of Jagdamba mother at Kotamgaon started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.