नाशकात सहस्त्रदीप प्रज्वलनाने नववर्षाचे स्वागत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:47 PM2017-12-26T15:47:47+5:302017-12-26T15:48:52+5:30

Navaratna will celebrate the new year with festive siesta | नाशकात सहस्त्रदीप प्रज्वलनाने नववर्षाचे स्वागत होणार

नाशकात सहस्त्रदीप प्रज्वलनाने नववर्षाचे स्वागत होणार

Next
ठळक मुद्देरामकुंड : शिवनेरी मंडळाचा अनोखा उपक्रम


नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृती टिकून राहावी, यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ३१ रोजी रात्री आठ ते बारा या वेळेत रामकुंडावर सहस्त्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना आजची तरुणाई पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करून मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहनांवर बसून शांततेचा भंग करतात. नववर्षाचे स्वागत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचे स्वागत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर शेकडो दीप प्रज्वलित करून करण्यात येणार आहे. या सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्याबरोबरच पार्श्वगायक रवींद्र साठे, मीना परूळेकर यांचा भक्तिधारा हा कार्यक्र म होणार आहे.

Web Title: Navaratna will celebrate the new year with festive siesta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.